News Flash

‘शिवगामी’ फेम अभिनेत्रीच्या गाडीत सापडल्या ९६ दारुच्या बाटल्या, चालक अटकेत

तामिळनाडू पोलिसांची कारवाई

बाहुबली चित्रपटात शिवगामी देवी ही भूमिका साकारणारी रम्या क्रिश्नन ही अभिनेत्री पुन्हा एकदा चुकीच्या कारणांसाठी चर्चेत आली आहे. ११ जून रोजी तामिळनाडू पोलिसांनी केलेल्या कारवाईत रम्या क्रिश्ननच्या SUV गाडीमधून ९६ दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला असून गाडीचा चालक सेल्वाकुमार याला अटक करण्यात आली आहे. पोलीस तपासादरम्यान रम्या गाडीत हजर असल्याचं कळतंय.

पोलीस अधिकारी मुथूकडू पोस्टवर गाड्यांचा तपास करत होते. महाबलीपूरम भागातून रम्याची गाडी यावेळी येत असताना पोलिसांनी चौकशीसाठी गाडी थांबवली. गाडीत बसलेल्या रम्याने पोलिसांना चौकशीसाठी सहकार्य केलं. तपासादरम्यान पोलिसांना रम्याच्या गाडीत ९६ दारुच्या बाटल्या सापडल्या. तामिळनाडूत अद्याप दारुची दुकानं सुरु करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे लॉकडाउन काळात दारु बाळगण हा गुन्हा आहे. पोलिसांनी चौकशीअंती रम्याचा चालक सेल्वाकुमारला अटक केली. अभिनेत्री रम्याने अद्याप या प्रकारावर आपली कोणतीही प्रतिक्रीया दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 7:14 pm

Web Title: 96 liquor bottles seized from ramya krishnans car driver arrested psd 91
Next Stories
1 “…तर पुढील १०० वर्ष देशात विकास होणार नाही”; अभिनेत्याची धक्कादायक भविष्यवाणी
2 “त्यांना आपली जमीन बळकावायची आहे”; अभिनेत्री चीनवर संतापली
3 “त्या अपघातानंतर माझं करिअर उध्वस्त झालं”; ‘जोश’ फेम अभिनेत्याने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
Just Now!
X