20 March 2019

News Flash

नाट्यदिंडीत कलेसाठी एकवटले ४०० लोककलावंत

पाहा नाट्यदिंडीचा दिमाखदार सोहळा

Marathi 98th Natya Sammelan, ९८वं अखिल भारतीय नाट्यसंमेलन

सलग ६० तास चालणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे बिगूल वाजले आहे. मुलुंडच्या महाकवी कालिदास नाट्यगृहात हे संमेलन पार पडत आहे. दिमाखदार नाट्य दिंडीने या संमेलनाची सुरुवात झाली. यंदा नाट्यसंमेलनाचं यजमानपद भुषवण्याची संधी मुलूंडकरांना मिळाली असून, जवळपास २५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंचतर हे संमेलन मुंबईत पार पडत आहे. मुलुंड रेल्वे स्थानकापासून ही दिंडी निघाली आणि यामध्ये ४०० लोककलावंत सहभागी झाले. मुलुंड रेल्वे स्थानकापासून सुरु झालेली ही नाट्यदिंडी एम.जी.रोड, पाच रस्ता मार्गातून पुढे कालिदास नाट्यगृहाजवळ पोहोचली.

नाट्यपरिषदेच्या फेसबुक पेजवरुन या संपूर्ण सोहळ्यातील क्षणचित्रे आणि व्हिडिओ पोस्ट करण्यात येत असून, त्या माध्यमातून रसिकांपर्यंत हा सोहळा पोहोचवण्यात येत आहे. नाट्यदिंडीचा नयनरम्य सोहळा फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवण्यात आला.

पाहा नाट्य दिंडी-

या संमेलनाचा उद्धाटन सोहळा सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पार पडणार असून, त्यासाठी शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर, राज ठाकरेही या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. त्यामागोमागच रुपरेषेप्रमाणे इतर कार्यक्रमांना सुरुवात होणार असून, यामध्ये नाट्यदिंडी, संगीत सौभद्रपासून, दशावतार, नमन यांसारख्या लोककलांचा जागरही पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

 

 

First Published on June 13, 2018 4:02 pm

Web Title: 98th akhil bhartiya marathi natya sammelan at mulund natya dindi live