News Flash

व्यसनी म्हणणाऱ्या महिला डॉक्टरला आर. माधवननं सुनावलं

त्याचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

बॉलिवूड कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ते सतत त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करताना दिसतात. पण बऱ्याच वेळा त्यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. असेच काहीसे अभिनेता आर. माधवनसोबत झाले आहे. पण तो देखील शांत बसला नाही. त्याने ट्रोल करणाऱ्या महिलेला सडेतोड उत्तर दिले आहे.

नुकताच अभिनेता अमित साधने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर आर. माधवनसोबतचा एक फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने, ‘भाऊ… मॅडी सर… तु मला पुन्हा प्रेरणा दिली आहेस… माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.

अमित साधचे ट्विट एका महिला डॉक्टरने रिट्विट केले. ‘मॅडी कधी काळी माझा जीव की प्राण होता. पण आता दारु आणि ड्रग्जच्या आहारी गेल्यामुळे त्याने त्याचे करिअर, आयुष्य उद्ध्वस्त केले असल्याचे पाहणे थोडे निराशाजनक आहे. रेहना है तेरे दिल में या चित्रपटातून जेव्हा त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले तेव्हा तो वेगळा दिसत होता. आणि आता त्याचा चेहरा, त्याचे डोळे खूप काही सांगून जातात…’ या आशयाचे ट्विट त्यांनी केले होते.

हे ट्विट पाहून आर. माधवनने त्यांना उत्तर देत सुनावले आहे. ‘ओह.. तर हे आहे तुमचे डायग्नोसिस? मला तुमच्या रुग्णांची काळजी वाटते. मला असे वाटते तुम्हाला स्वत:ला डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे’ या आशयाचे ट्विट त्याने केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 6:19 pm

Web Title: a doctor accused r madhavan of being druggist and alcoholic actor gave a buffeting reply avb 95
Next Stories
1 बिग बॉसच्या घरात होणार राखी सावंतच्या नवऱ्याची एण्ट्री?
2 गृहिणींना पगार देण्याचं थरुरांनी केलं स्वागत; कंगना म्हणाली, “जोडीदारासोबतच्या सेक्ससाठी…”
3 म्हणून ‘मैंने प्यार किया’मधील भाग्यश्रीच्या पतीला चाहत्यांनी सुनावले होते
Just Now!
X