सनी लिओनीचे अनेक चाहते आहेत. यात आता लहान मुलीचाही समावेश झाला आहे. सनीने इंस्ट्राग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एक लहान मुलगी आपल्या आई वडिलांना सोडून सनी लिओनीला घट्ट मिठी मारुन बसली आहे.
सनीसाठी तिचं प्रेम पाहून तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. या लहान मुलीची आई तिला अनेकदा आपल्याकडे बोलावून घेत होती. पण, ती मुलगीच सनीला घट्ट मिठी मारून निरागसपणे तिच्याकडे बसली होती. ती तिच्या आईकडे जात नाही असे बघून सनीही मग तिला आपल्याबरोबर घेऊन जायला तयार झाली. शेवटी ती मुलगी आपल्या आईकडे गेली, पण सनीसाठी तिचं हे प्रेम पाहून अनेकजण अचंबित झाले होते.
सनी लिओनीने हा व्हिडिओ शेअर करताना, ‘तिला मला सोडायचेच नव्हते. ती खूप गोंडस आहे.’ असा मॅसेजही तिने यावेळी लिहीला.
सनी लवकरच अरबाज खान याच्या ‘तेरा इंतजार’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे चित्रिकरण सध्या सुरु आहे. याशिवाय ‘बेईमान लव’ आणि ‘टीना अॅण्ड लोलो’ या सिनेमांतही तिच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 27, 2016 5:49 pm