News Flash

अबरामच्या ‘शूज’चे अनोखे कलेक्शन

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानचे त्याच्या मुलांप्रतीचे प्रेम सर्वश्रूत आहे.

शाहरूखने अबरामच्या 'शूज'चे कलेक्शन सोशल मिडियावर पोस्ट केले आहे

CQ8CYbPUYAAyr_9
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानचे त्याच्या मुलांप्रतीचे प्रेम सर्वश्रुत आहे. जगभरात तो कोठेही शूटिंग करत असला अथवा कामात व्यस्त असला, तरी शाहरूख वेळातवेळ काढून आर्यन, सुहाना आणि छोट्या अबरामबाबतचे अपडेट्स सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सध्या ‘दिलवाले’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेल्या शाहरूखने अबरामच्या ‘शूज’चे कलेक्शन सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. क्रॉक्स, सँण्डल, स्पोर्टस् शूज, स्निकर्स आणि मेटॅलिक स्ट्रॅप शूज असे विविध प्रकारचे शूज अबरामच्या शूज कलेक्शनमध्ये आहेत. या मे महिन्यात दोन वर्षांचा झालेला अबराम सतत माध्यमातून चर्चेत असतो. आत्तापासूनच त्याचा फॅन फॉलोअर तयार झाल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अलिकडे तो एका आलिशान गाडीतून ‘दिलवाले’चा दिग्दर्शक रोहित शेट्टीबरोबर फेरफटका मारताना नजरेस पडला होता. शाहरूख खान आणि काजोलची मोठ्या पडद्यावरील यशस्वी जोडी ‘दिलवाले’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. चित्रपटात वरुण धवन आणि किर्ती सनोन यांच्यादेखील भूमिका आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 2:22 pm

Web Title: a look at shah rukh khans son abrams shoe collection
Next Stories
1 स्पृहा जोशी बनणार ‘किचनची सुपरस्टार….’
2 एक बोट ‘युजलेस’ असल्याचा आलियाला साक्षात्कार!
3 बॉलीवूडचे तिन्ही खान अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत- अमिताभ बच्चन
Just Now!
X