News Flash

म्हणून त्याने रस्त्यात अजय देवगणची गाडी अडवली…!!

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ भाष्य करण्याची केली मागणी

अभिनेता अजय देवगण मुंबईच्या फिल्मसिटीकडे जात असताना एका अज्ञातानं त्याची गाडी अडवल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

आज सकाळी ही घटना घडल्याचं वृत्त डीएनए इंडियाने दिलं आहे. या वृत्तानुसार, राजदीप सिंग असं या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. अजय मुंबईच्या फिल्मसिटीकडे जात असताना राजदीपने त्यांची गाडी अडवून त्यांना शेतकरी आंदोलनावर भाष्य करायला सांगितलं.

त्याच्या म्हणण्यानुसार, शेतकरी आंदोलनाला शंभरहून अधिक दिवस झाले तरी अजयने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कोणतंही मत व्यक्त केलं नाही म्हणून त्याने अजय यांची गाडी अडवून त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला.राजदीपने १५ ते २० मिनिटे अजय यांची गाडी अडवून ठेवल्याचं समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी राजदीपला अटक केली असून त्याच्या आयपीसीच्या 341, 504 आणि 506 या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच्यासोबत असलेल्या राजदीपच्या मित्राने सांगितलं की, राजदीप फक्त अजयशी शेतकऱ्यांच्या हक्काप्रकरणी बोलण्यासाठी गेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 7:05 pm

Web Title: a man stopped the car of ajay devgan vsk 98
Next Stories
1 ‘तुझं माझं जमतंय’ चे १०० भाग पूर्ण; आता पम्मी आणणार कथेत ट्विस्ट!
2 मोठ्या ब्रेकनंतर ‘ही’अभिनेत्री करणार आहे कमबॅक
3 राखीच्या आईला भेटायला गेला विकास गुप्ता, व्हिडीओ पाहून चाहते भावूक
Just Now!
X