News Flash

‘अ मॅरिड वूमन’चा टीझर प्रदर्शित; पाहा व्हिडीओ

एकता कपूरने शेअर केला व्हिडीओ

सध्याच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मला विशेष पसंती मिळत आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेक चित्रपट, वेबसीरिज ओटीटीवर प्रदर्शित झाल्याचं पाहायला मिळत आहे. २०२० मध्ये अल्ट बालाजीने त्यांच्या आगामी ‘अ मॅरिड वूमन’ या सीरिजची घोषणा केली होती. त्यानुसार, आता या सीरिजचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं असून टीझरदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

प्रसिद्ध लेखिका मंजू कपूर यांच्या बेस्टसेलर ठरलेल्या ‘अ मॅरिड वूमन’ या कादंबरीवर आधारित ही सीरिज असून या सीरिजचं पहिलं पोस्टर आणि टीझर एकता कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Erkrek (@ektarkapoor)


‘अ मॅरिड वूमन’ या सीरिजची कथा आस्था या पात्राभोवती फिरताना दिसते. कर्तव्य आणि इतरांसाठी सतत धावपळ करणारी स्त्री स्वत:च अस्तित्व विसरत चालली आहे. यावर या सीरिजमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे.

दरम्यान, या सीरिजमध्ये रिधी डोगरा, मोनिका डोगरा,इमाद शाह, दिव्या सेठ शाह, नादिरा बब्बर, सुहास आहुजा ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ही सीरिज ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2021 2:04 pm

Web Title: a married woman teaser out a mysterious love story ssj 93
Next Stories
1 स्वप्नपूर्ती! निक-प्रियांकाच्या गृहप्रवेशाचे कधीही न पाहिलेले फोटो
2 anniversary Special : तिच्या एका होकारामुळे महेश बाबू झाला महाराष्ट्राचा जावई!
3 काळवीट हत्या प्रकरण : ते प्रतिज्ञापत्र चुकून दिलं, सलमाननं मागितली माफी
Just Now!
X