News Flash

कॉमेडियन सुनील ग्रोव्हरच्या स्वयंपाक घरातून माकडाने केली चोरी, व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हिडीओ

कॉमेडियन सुनील ग्रोव्हर ‘द कपिल शर्मा’ शोमुळे घराघरात पोहोचला. त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सुनील सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे दिसते. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या सुनीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

सुनीलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक माकड सुनीलच्या स्वयंपाक घरात येताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहुन हे स्वयंपाक घर सुनीलच्या घरातल नसून कोणत्यातरी सेटवरचं असल्याचे दिसतं आहे. सुनील व्हिडीओ शूट करत असताना माकड पटकन दह्याचा डब्बा उचलून घेऊन जातो. तर इथे सुनील हसत राहतो आणि म्हणतो की ‘दही घेऊन गेला तो’. हा व्हिडीओ शेअर करत त्याने “दही घेऊन गेला” असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ४ लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

या आधी देखील सुनीलने असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यापैकी एकात सुनील दाल मखनी बनवत होता. तर एका व्हिडीओत त्याने छोले कुल्चे बनवताना दिसत आहे. तर कधी जुस बनवताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

सुनील ग्रोव्हरची ‘तांडव’ ही वेब सीरिज काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झाली होती. या वेब सीरिजमध्ये सुनीलने, अभिनेता सैफ अली खान, मौहमद जीशान अय्यूब, अभिनेत्री गौहर खान, डिंपल कपाडिया यांच्या सोबत मुख्य भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधून सुनील फक्त एक कॉमेडियन नाही तर एक उत्तम अभिनेता असल्याचे दिसून आले आहे. या आधी सुनीलने ‘गब्बर इज बॅक’, ‘भारत’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 6:02 pm

Web Title: a monkey came in comedian sunil grover kitchen and stole curd dcp 98
Next Stories
1 बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठाच्या बर्थडे पार्टीला श्रद्धा कपूरने लावली हजेरी
2 ‘जॉबलेस’ सीरिजच्या शूटिंगचा श्रीगणेशा
3 ‘राम सेतू’मध्ये अक्षयसोबत दिसणार या अभिनेत्री?
Just Now!
X