News Flash

Video : मोदींसारखीच रजनीकांतही करणार बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफारी

कर्नाटकातील बंदिपूर राष्ट्रीय उद्यानात या एपिसोडचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हजेरी लावलेल्या ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ फेम बेअर ग्रिल्सचा अपकमिंक शो ‘इंटू द वाइल्ड विद बेअर ग्रिल्स’ (Into the wild with Bear Grylls)  या शोमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत हजेरी लावणार असल्याचे म्हटले जात होते. नुकताच बेअर ग्रिल्सने रजनीकांत यांच्या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सध्या हा प्रमो चाहत्यांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे.

कर्नाटकातील बंदिपूर राष्ट्रीय उद्यानात रजनीकांत यांचा ‘इन टू वाइल्ड’ या शोमधील एपिसोडचे चित्रीकरण करण्यात आला आहे. व्याघ्र संवर्धन प्रकल्पांतर्गत १९७४ साली हे उद्यान स्थापन करण्यात आले. आता सुपरस्टार रजनीकांत आणि बेअर ग्रिल्सला समोरासमोर पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत. ‘दोन वाघांचा सामना पाहायला मिळणार’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी रजनीकांत यांच्या बेअर ग्रिल्ससोबतच्या या एपिसोडविषयी उत्सुकता व्यक्त केली.

बेअर ग्रिल्सने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये ‘थलायवा’चा कधी न पाहिलेला अंदाज पहायला मिळत आहे. रजनीकांत हे घनदाट जंगलामध्ये झाडाला टांगून पुढे जाताना दिसत आहेत. तर दुसरीकडे त्यांनी चालत एक नदी पार केली आहे. तसेच रस्त्यात येणारा एक जुना पुल त्यांनी टांगून पार केला आहे. एकंदरीत रजनीकांत यांच्या वयाच्या मानाने हे सर्व अॅडवेंचर करणे खूप प्रेरणादायी आहे. रजनीकांत यांचा हा एपिसोड २३ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

हा प्रोमो शेअर करत ‘सुपरस्टार रजनीकांत यांची अथक सकारात्मकता आणि कधीही न हरण्याची वृत्ती जंगलामध्ये पाहायला मिळाली. ज्यामुळे त्यांनी त्यांच्यासमोर आलेले प्रत्येक आवाहन स्वीकारले’ असे कॅप्शन बेअरने दिले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 4:26 pm

Web Title: a new promo of into the wild with bear grylls shows rajinikanth braving difficulties inside the bandipur tiger reserve avb 95
Next Stories
1 दीपिकाच्या बिकीनी फोटोनं वाढवलं सोशल मीडियाचं तापमान
2 ट्रोल झालेल्या नुशरतच्या ‘त्या’ ड्रेसची किंमत ऐकून व्हाल थक्क!
3 ‘टकाटक’ फेम रितीका आता नव्या भूमिकेत