News Flash

“पुलिस अब जल्दी नही आएगी”, अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी बातमी

वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे आणि कडक होणाऱ्या निर्बंधामुळे घेतला निर्णय

करोना टाळेबंदीमुळे लागलेल्या दीर्घकालीन निर्बंधानंतर आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याची चिन्हं दिसत आहेत. अशातच अनेक चित्रपट आता प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे चित्रपट रसिकांना बऱ्याच नवीन चित्रपटांची मेजवानी मिळणार आहे. अभिनेता अक्षय कुमारचेही बरेच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचे चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशाच एका चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दलची ही बातमी आहे.

अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ हा चित्रपट येत्या २ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण सध्याची करोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आणि त्या अनुषंगाने कडक केलेले निर्णय पाहता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निर्मात्यांनी पुढे ढकलल्याचं वृत्त बॉलिवूड हंगामाने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

त्यांच्या वृत्तानुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता अक्षय कुमारसह संपूर्ण टीमने या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात करोनाचे रुग्ण वेगानं वाढत आहेत.’सुर्यवंशी’ हा एक बिग बजेट चित्रपट आहे. काही  संचारबंदी भागांमध्ये संचारबंदी लागू असताना हा चित्रपट प्रदर्शित करणं योग्य ठरणार नाही, असं या चित्रपटाच्या टीमनं स्पष्ट केलं आहे.

नवीन रीलीज डेटबद्दल विचारलं असता सर्व टीमशी, गुंतवणूकदारांशी संवाद साधून या बद्दलचा निर्णय घेणार असल्याचं टीमने सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2021 5:16 pm

Web Title: a news for akshay kumar fans relase date is postponed vsk 98
Next Stories
1 भूषण प्रधान ‘कॅान्ट्रॅक्ट मॅरेज’ घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला
2 अनिल कपूरच्या मुलीचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व्हायरल, सोशल मीडियावर चर्चेत
3 लग्नाच्या ३ महिन्यानंतर गौहर खान प्रेग्नंट?, अभिनेत्रीने केला खुलासा
Just Now!
X