ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी खेळाडू टोकियोला रवाना झाले आहेत. त्यांना ट्रिब्यूट देण्यासाठी गायिका-गीतकार अनन्या बिर्लाने नवा ट्रॅक ‘हिंदुस्तानी वे’ सादर केला आहे. या उत्साहवर्धक आणि आकर्षक ट्रॅकची रचना आणि निर्माण सेंसेशनल अनन्या बिर्ला आणि ऑस्कर, बाफ्टा आणि ग्रॅमी विजेते संगीतकार ए. आर. रहमान यांनी केली आहे.

अनन्या, निर्मिका सिंह आणि शिशिर सामंत द्वारा संयुक्तपणे लिहिलेल्या प्रेरणा-प्रेरक गीतांसोबत देशभक्तिने परिपूर्ण हा ट्रॅक प्रेक्षकांना उत्साहित करेल. इंग्लिश व्होकल्स आणि उत्तम हिंदी ट्रॅकसोबत भारतीय खेळाडूना उत्साही करेल आणि सामान्यांमध्ये हे गाणं एकता आणि आणि आशावादाचा संदेश पसरवेल.

आणखी वाचा : ‘तुला हे करावं लागेल…’, ‘मोमो’ने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

डैनी मामिक आणि सहान हट्टंगडी यांच्याद्वारे दिग्दर्शित व एंटीमैटर मीडिया प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित हा म्यूजिक व्हिडीओ, क्रीडाप्रेमींना उलटे आकडे मोजायला उद्युक्त करेल. यामध्ये अटलांटा (१९९६), एथेंस (२००४), बीजिंग (२००२,२००८), रियो (२०१६), लंडन (२०१२)चे प्रमुख ऑलिम्पिक अभिलेखीय फुटेज आणि या वर्षीच्या संघाचे विशेष प्रशिक्षण फुटेज दाखवण्यात आले आहे.

आणखी वाचा : ‘माझ्याकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे मी मुलाला लाँच केले नाही’, परेश रावल यांचा खुलासा

जगभरात करोना संक्रमण आणि लॉकडाऊनमुळे एका वर्षाच्या स्थगितीनंतर टोकिओ ऑलिम्पिक २०२० होणार असून उत्साहाचा पारा नवी उंची गाठू पाहत आहे, आणि जगभरातील या सर्वात मोठ्या खेळ आयोजनातील उत्तम कामगिरीबाबत आपल्या स्टार एथलीट्सकडून भारतीयांच्या आशा देखील पल्लवित होत आहेत.