प्रेमात पडणाऱ्यांसाठी आणि प्रेमात पडलेल्यांसाठी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट अत्यंत खास आहे. राज (शाहरुख खान) आणि सिमरन (काजोल) यांच्यातील केमिस्ट्री प्रत्येक प्रेक्षकाला आणि तरुणाईला भावली, त्यामुळे हा चित्रपट त्याकाळी तुफान लोकप्रिय झाला. इतकंच नाही तर आजही या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. दिवाळीनिमित्त ऑकलँडमध्ये या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑकलँडमधील ओआटिया स्क्वेअरमध्ये प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहिला.

इथे मोकळ्या गार्डनमध्ये मोठ्या स्क्रीनवर चित्रपटाची स्क्रीनिंग करण्यात आली. गवतावर बसून तर काहींनी निवांत झोपून या चित्रपटाचा आनंद लुटला.

आणखी वाचा : या निसर्गरम्य ठिकाणी होतंय ‘आई माझी काळुबाई’ मालिकेचं शूटिंग

१९९५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात रोमॅण्टीक चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाने त्याकाळी बॉक्स ऑफिसवर विविध विक्रम प्रस्थापित केले. या चित्रपटातील रेल्वे स्टेशनवरील काजोलचा पलट सीन तुफान गाजला होता. हा सीन आजही ‘आयकॉनिक सीन’ म्हणून ओळखला जातो.

लंडनमध्ये राज-सिमरनचा पुतळा

चित्रपटात लंडनमधील लिसेस्टर स्क्वेअर येथे चित्रित झालेले एक दृश्य आहे. त्याच दृश्यावर आधारित राज आणि सिमरनचा पुतळा याच परिसरात ‘सीन्स इन द स्क्वेअर’ अंतर्गत उभारण्यात येणार आहे.