मयंक बोकाडिया दिग्दर्शित ‘आधा चाँद तुम देखलो’ या चित्रपटाने ‘अथर्व ऱ्हीदम २०१६’ या चित्रपट आणि दूरदर्शन मालिका स्पर्धेत बाजी मारली. मालाड येथील अथर्व महालिद्यालयात तीन दिवसाच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात अडिचशे लघूपट आणि माहितीपटानी सहभाग घेतला.
या स्पर्धेतील अन्य काही विजेते असे, सर्वोत्कृष्ट माहितीपट – ‘अमदाबाद मा फेमस’ (दिग्दर्शक हार्दिक मेहता), विद्यार्थी निवड – ‘बिरयानी’ (दि. सचिन अंबाट), सर्वोत्कृष्ट अभिनेता – मुस्ताकीम खान (रिहा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – दिव्या सतुराज चव्हाण (फ्रेम्ड). या लघुपटात ब्लॅक कॉमेडी, नाट्य इत्यादी प्रकारांचा समावेश होता. उभरत्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असल्याचे अथर्वचे कार्यकारी अध्यक्ष सुनील राणे यांनी यावेळी सांगितले. यावेळी ‘मुरारी – द मॅड जंटलमन’ या चित्रपटाचे कलाकारही हजर होते. त्यात संजय सिंह, नतालिया, यजुवेंद्र सिंह, किशोर पटेल, किरण शरद, सुनील पाल इत्यादींचा समावेश होता.