News Flash

‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन

करोनामुळे त्यांचे निधन झाले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये काम करणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेच्या वडिलांचे निधन झाले आहे. १८ मे रोजी त्यांचे करोनामुळे निधन झाले आहे. अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे यांनी वयाच्या ५६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

काही दिवसांपूर्वी अश्विनीच्या वडिलांना करोना झाला होता. त्यानंतर त्यांना भोर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतो. पण १८ मे रोजी त्यांचे निधन झाले आहे.

अश्विनीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहे. तसेच ती ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत राणू अक्का साहेब यांच्या भूमिकेत दिसली होती. ‘टपाल’ आणि ‘बॉइज’ या चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:11 pm

Web Title: aai kuthe kay karte fame ashwini mahangade father passes away due to covid 19 avb 95
Next Stories
1 वयाच्या ५०व्या वर्षी ही मॉडेल झाली आई
2 कोरिओग्राफर गीताने केले लग्न? व्हायरल झालेला फोटो पाहून म्हणाली..
3 ‘रणबीर, करिश्मा आणि करीना घराणेशाहीमुळे नाही तर…’, रिद्धिमा कपूरचा खुलासा
Just Now!
X