News Flash

सर्पसंकटातून ‘आर्या’ स्वतःला कशी वाचवेल?

पाटील घरात आल्यापासून आर्या तिच्या भावाचा म्हणजेच संकेतचा शोध घेताना जीवघेण्या संकटात सापडते.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळुबाई’ सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याची विशेष चर्चा सोशल मीडियावर सातत्याने होताना दिसते. ‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे. विशेष म्हणजे या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यातच होत असल्यानं मालिकेला मातीतला अस्सलपणा आणि दृश्यश्रीमंती लाभली आहे.

मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. आपल्या भावाला, संकेतला शोधण्यासाठी आर्या माधवराजेंची अट मान्य करून त्यांच्या मुलाशी, अमोघशी लग्न करते. पाटील घरात आल्यापासून आर्या तिच्या भावाचा म्हणजेच संकेतचा शोध घेताना वेगवेगळ्या जीवघेण्या संकटात सापडते. त्यापैकीच एक संकट म्हणजे विषारी सापाशी तिचा सामना होतो. आर्यावर हे सर्पसंकट नेमके कसे आले आणि कोणी घडवून आणले, त्यातून आर्या कशी मार्ग काढते, त्यात तिला आई काळुबाईचा काय संकेत मिळतो याची उत्कंठावर्धक गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

‘आई माझी काळुबाई’ ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 23, 2020 8:46 pm

Web Title: aai majhi kalubai marathi serial latest updates ssv 92
Next Stories
1 ‘माझ्या संगोपनाबाबत प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही’, जान सानू वडिलांवर भडकला
2 मामा-भाच्याचा वादात कश्मीराची उडी? सोशल मीडिया पोस्ट चर्चेत
3 नव्या मालिकेसाठी सज्ज झालाय सिद्धार्थ चांदेकर
Just Now!
X