‘सिद्ध आहे, मी स्वयंसिद्ध…’ भेदक नजर रोखत समोरच्याचा थरकाप उडवणारे हे शब्द सध्या घराघरांत ऐकू येत आहेत. खलनायक विराटची एण्ट्री चांगली गाजत आहे. आर्याच्या बाबतीत काय घडणार, या कल्पनेने प्रेक्षकांच्या मनात धाकधूक निर्माण होते. ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेत मिलिंद शिंदे यांनी साकारलेला ‘विराट’ अल्पावधीतच लोकप्रिय ठरला आहे.

‘आई माझी काळुबाई’ ही गोष्ट आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आर्याची भूमिका साकारत आहे तर अलका कुबल काळुबाईची भूमिका साकारत आहेत. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान मिळवलं आहे.

Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Kangana Ranut and surpiya
काँग्रेसच्या महिला नेत्याने पोस्ट केलेल्या कंगनाच्या ‘त्या’ फोटोवरून वादंग; अभिनेत्री म्हणाली, “वेश्याव्यवसाय करणाऱ्या…”
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

आर्या आणि विराट यांच्यामधली म्हणजेच काळुबाईचा आणि एका दैत्याचा पुनर्जन्म यांच्यामधली ही लढाई काय वळण घेईल आणि आर्याच्या आयुष्यात विराट अजून कोणती संकट निर्माण करेल हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल. आई माझी काळुबाई ही मालिका सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.