News Flash

जबाबदारीची जाणीव करुन देणाऱ्या ‘आक्रंदन’ची पहिली झलक

हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

समाजात स्त्रीला अनेकवेळा एक भोगवस्तू म्हणूनच पाहिलं जातं. त्यामुळे दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. याच कारणास्तव या भयाण वास्तवाची जाणीव करून देतानाच आपल्या जबाबदारीची जाणीवही करून देणाऱ्या ‘आक्रंदन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाची पहिली झलक केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. यावेळी दिग्दर्शक राजकुमार संतोषी, अल हज हजरत झहीद हुसैन चिश्ती यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते.

समाजातील संवेदनशील विषयाला चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडण्याच्या प्रामाणिक प्रयत्नाला दाद देत या चित्रपटाला रामदास आठवले यांनी शुभेच्छा दिल्या. विवेक पंडित प्रस्तुत व गोविंद आहेर निर्मित ‘आक्रंदन’ चित्रपटामध्ये एका गरीब असाहाय्य महिलेवर झालेली अत्याचाराची घटना, या घटनेनंतर एकत्र येत समाजात न्यायासाठी झालेला उठाव या भोवती चित्रपटाचे कथासूत्र गुंफण्यात आले आहे .

दरम्यान, या चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये, शरद पोंक्षे, मिलिंद इनामदार, गणेश यादव, बाळ धुरी यासोबत विक्रम गोखले, स्मिता तळवळकर, अमिता खोपकर, प्रदीप वेलणकर, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे, तेजश्री प्रधान, विलास उजवणे, पल्लवी वाघ, स्नेहा बिरांजे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 12:54 pm

Web Title: aakrand marathi movie first poster
Next Stories
1 मिमोहच्या लग्नातला ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल
2 मुस्लीम आवडतात का?; वाचा सोनम काय म्हणाली..
3 केलेल्या चुकीचा पश्चाताप होतो -संजय दत्त
Just Now!
X