News Flash

आलियाची नवी झेप, स्वत:च्या प्रोडक्शन हाउसची सुरुवात

पहा कसं आहे आलियाचं नवं ऑफिस

अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या सिनेमाचा टीझर लॉन्च झाल्यानंतर अनेकांनी आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलं. तर काहींनी या भूमिकेसाठी आलियाची निवड योग्य नसल्याचं म्हंटल. असं असलं तरी आलियाने अभिनय क्षेत्रात वेगवेगळ्या भूमिका साकारात तिचं अभिनय कौशल्य सिद्ध केलंय.

अभिनयात लोकप्रियतेचं शिखर गाठल्यानंतर आता आलिया भट्ट एका नव्या भूमिकेत स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सज्ज झालीय. आलियानं स्वत:च प्रोडक्शन हाउस सुरु केलंय. ‘इटरनल सनशाइन प्रोडक्शन’ असं तिच्या प्रोडक्शन हाउसचं नावं आहे. आलियाने कंपनीचा लोगो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. आलियाने शेअर केलेल्या लोगोमध्ये कंपनीच्या नावासोबत मांजरीचं कार्टून आहे. आलिया प्राणीप्रेमी असल्याचं तिच्या लोगोवरुन लक्षात येतंय. “मला प्रोडक्शन हाउसची घोषणा करताना आनंद होतोय. चला आम्हाला काही कथा सांगू द्या, काही आनंदी, काही उबदार, काही सत्य कथा” अशा आशयाचं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलंय. येत्या काळात आलिया अभिनयासोबत निर्माती म्हणूनही सिनेसृष्टीत तिचं नशीब आजमवणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

2019 सालात आलियानं एक जागा खरेदी केली होती. यावेळी आलिया नव्या ठिकाणी राहायला जाणार अशा चर्चा रंगत होत्या. मात्र बॉलिवूड हंगामाच्या एका मुलाखतीत आलियानं ही जागा तिच्या ऑफिससाठी घेतल्याचं सांगितलं होतं. आलियाने जुहू इथं तिचं नवं ऑफिस सुरु केलं आहे. प्रोडक्शन डिझायनर रुपीन सूचक यांनी आलियाच्या नव्या प्रोडक्शन हाउसच्या ऑफिसची सजावट केलीय. रुपीन यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर आलियाच्या ऑफिसचे फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rupin Suchak (@rupinsuchak)

उद्योग क्षेत्रात पाऊल टाकण्याची खरं तर आलियाची ही पहिली वेळ नाही. याआधी आलियाने लहान मुलांसाठी फॅशन लाईन सुरु केली आहे. ‘एड-ए-ममा’ हे ब्रॅण्ड तिने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये लॉन्च केलंय.
आलियाचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा सिनेमा 20 जुलैला प्रदर्शित होतोय. त्याचसोबत रणबीर कपूरसोबत आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या बिग बजेट सिनेमात झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 12:47 pm

Web Title: aalia bhat announced her own production house eternal sunshine kpw 89
Next Stories
1 रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत; नवा फोटो होतोय व्हायरल
2 शनाया कपूरच्या बेली डान्सचा जलवा, व्हिडीओ पाहून चाहते घायाळ
3 विरूष्कानंतर सैफ-करीनाने घेतला बाळासाठी महत्त्वाचा निर्णय?
Just Now!
X