अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या स्वत:च्या प्रोडक्शन हाउसची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासातच  आणखी एक बातमी चाहत्यांना दिलीय. आलियाने तिच्या इटरनल सनशाइन प्रोडक्शनच्या पहिल्या सिनेमाची घोषणा केलीय. किंग खानच्या प्रोडक्शन हाउससोबत एकत्र येत या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. ‘डार्लिंगस्’ असं या सिनेमाचं नाव आहे.

आलिया भट आणि शाहरुख खान या दोघांनीही इन्स्टाग्रामवरुन ‘डार्लिंगस्’ या सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाचा टीझर त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केलाय. जसमीत रीन हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून दिग्दर्शनातील त्यांचं हे पदार्पण आहे. आलिया भट्ट आणि शेफाली शहा यांची या सिनेमात मुख्य भूमिका पाहायला मिळणार आहे. तर एका मध्यम वर्गीय कुटुंबातील आई मुलीचं नात आणि त्यांची समाजात ओळख निर्माण करण्यासाठी होणारी धडपड असं या सिनेमाचं कथानक आहे. सिनेमात डार्क कॉमेडी पाहायला मिळलं असं शाहरुखने त्याच्या कॅप्शनमधून सांगितलंय.

“आयुष्य खुप कठीण आहे डार्लिंग आणि तुम्ही दोघीदेखील ..या जगाशी तुमचा सामना आहे. काळजी घ्यावी असा सल्ला” असं कॅप्शन शाहरुखने या सिनेमाचं टीझर शेअर करताना दिलंय.सोबतच “ये कॉमेडी थोडी डार्क है” असं त्याने विशेष नमूद केलंय. तर सिनेमाच्या टीझरच्या सुरुवातीला काही सूचना देण्यात आल्याचं दिसतंय. यात ” महिलांचा अपमान करणं आरोग्यासाठी खुपच धोकादायक ठरू शकतं” असं सांगण्यातं आलंय. यावरुन महिला सक्षमीकरणावर आधारित सिनेमाचं कथानक आहे हे लक्षात येतं.

तर आलियाने देखील सिनेमाच टीझर शेअर करत आनंद व्यक्त केलाय. ‘माझ्या प्रोडक्शनच्या पहिल्या सिनेमासाठी मी खुप उत्सुक आहे . शिवाय माझा फेव्हरेट शाहरुख खानच्या रेड चिली एंटरटेन्मेट सोबत एकत्र येऊन सिनेमाची निर्मिती करताना मला आनंद होतोय’. असं ती म्हणालीय.आलियाच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावरुन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. तर अनेक सेलिब्रिटींनी आलियाचं कौतुक केलंय.