बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट गेल्या काही दिवसांपासून तिच्या सोशल मीडियावरून करोना काळात उपयुक्त माहिती नेहमी शेअर करताना दिसतेय. नुकतंच तिने तिच्या सोशल अकाऊंटवरून मेन्टल हेल्थ हेल्पलाइन नंबर शेअर केले आहेत. करोना काळात लोकांच्या मानसिक स्वास्थ्याबाबत जनजागृती करण्यासाठी मानसिक उपचार करणाऱ्या मेन्टल हेल्थ सेंटरची माहिती सुद्धा आलिया भट्टने शेअर केली आहे.

करोना परिस्थितीमुळे सर्वच जण आपापल्या घरातच अडकले आहेत. त्यामुळे लोकांना खूपच तणाव आणि चिंतेचा सामना करावा लागतो. कामाचा तणाव, घरात होणारे वादविवाद, नोकरी गमावणे इत्यादी कारणांमुळे बर्‍याच लोकांमध्ये मानसिक आरोग्याची परिस्थिती बिघडत चालली आहे. त्यासाठी अभिनेत्री आलिया भट्टने पुढाकार घेतलाय. तिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून मेन्टल हेल्थ हेल्पलाइन नंबर शेअर केले आहेत. ही पोस्ट शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ” सध्या काळ खूप कठिण सुरूये…तुम्ही कितीही मजबूत नसलात तरीही तुम्ही अनेकांची कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करू शकता…”.

पुढे लिहिताना ती म्हणाली, “हे काही मेन्टल हेल्थ सेंटर्सचे हेल्पलाइन नंबर आहेत, इथे मानसिक उपचार आणि मार्गदर्शन केलं जातं…” तसंच पोस्टच्या शेवटी तिने हे नंबर जपून ठेवा आणि गरजवंतापर्यंत ही पोस्ट शेअर करा, असं आवाहन देखील केलंय.

तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये मेन्टल हेल्थ सेंटरचं नाव, संपर्क क्रमांक, वेबसाईट, पत्ता अशी सगळी माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी बॉलिवूडची ‘मस्तानी’ अभिनेत्री दीपिका पादूकोण हिने देखील अशी माहिती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केली होती.

आलिया भटनेही केलाय मानसिक आजाराचा सामना,
अभिनेत्री आलिया भट्ट हीने बॉलिवूडमध्ये खूप कमी वयात तिनं यश मिळवलंय. पुर्वीच्या अनेक इंटरव्ह्यूमध्ये तिने कित्येकदा मानसिक आजाराचा सामना केला असल्याची कबूली दिली आहे. इतकंच नव्हे तर आलियाची बहिण शाहीनने देखील मानसिक आजाराशी सामना केलाय. तिच्या बालपणी घडलेल्या एका घटनेचा शाहीनच्या मनावर गंभीर परिणाम झाला होता.