25 March 2019

News Flash

वाढदिवसानिमित्त आमिर खान देणार चाहत्यांना सुखद धक्का!

सध्या याचीच चर्चा आहे

आमिर खान

ट्विटरवर बऱ्यापैकी सक्रीय असणारा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान मात्र इन्स्टाग्रामपासून चार हात लांबच आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी इन्स्टाग्रामवर सक्रीय आहेत. काहींचे तर या फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्मवर लाखोंनी चाहते आहेत. पण, सोशल मीडियाच्या मोहजालापासून आमिरनं स्वत:ला काही हात लांबच ठेवलं आहे. आता मात्र ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान इन्स्टाग्रामवर आपलं अकाऊंट सुरु करण्याच्या विचारात आहे.

अमिरचा १४ मार्चला वाढदिवस आहे आणि यानिमित्तानं तो इन्स्टाग्रामवर पदार्पण करण्याच्या विचारात असल्याची माहिती बॉलिवूड लाईफनं दिली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आमिर इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू करण्याचा विचार करत होता पण वाढदिवसारखा दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही म्हणूनच आमिर १४ मार्चची वाट बघत असल्याचं सांगितलं जात आहे. आमिरचे ट्विटरवर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या गेलेल्या अभिनेत्याच्या यादीत आमिरचाही समावेश आहे.  आमिर सध्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात आमिरसोबत कटरिना कैफ, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत आहेत.

First Published on March 13, 2018 6:59 pm

Web Title: aamir is planning to make his debut on instagram