‘संकरभारनम पुरस्कार’ सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आयोजकांनी अभिनेता आमिर खान, ज्युनिअर एनटीआर आणि धनुष यांना मानाचे पुरस्कार मिळाल्याचे घोषित केले. येत्या मंगळवारी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. के. विश्वनाथ यांच्या सन्मानार्थ अभिनेत्री तुलसी यांच्या हस्ते संकरभारनम पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी या पाच वेगवेगळ्या भाषेतील सिनेसृष्टीतील कलाकारांना दिला जातो.

हार्दिक पांड्या, भावा जिंकलस!

पाच सिनेसृष्टीतील कलाकारांना पुरस्कार देण्यामागचे कारण सांगताना तुलसी म्हणाल्या की, ‘दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते के विश्वनाथ हे माझे गुरू. विश्वनाथ यांनी दाक्षिणात्य तसेच हिंदी सिनेसृष्टीत काम केले आहे. सिनेमा हे असं सुंदर माध्यम आहे ज्याचा भाषा आणि भूगोलाचा काहीच संबंध नाही. विश्वनाथ, सिनेसृष्टीच्या ऐक्यासाठी नेहमीच उभे राहिले. तेलगू सिनेसृष्टीतील कलाकार आणि तंत्रज्ञ यांना अनेक पुरस्कार देण्यात येणार आहे. यावर्षी पुरस्कार सोहळ्यासाठी कमी वेळ असल्यामुळे कमी नामांकन देण्यात आली आहेत. पण पुढच्यावर्षी मात्र आम्ही फार आधीपासून या पुरस्कारांची तयारी करू.’

शाहरुख- अनुष्कामध्ये झालेला करार तुम्हाला माहितीये का?

आमिर खान याला नितेश तिवारी दिग्दर्शित ‘दंगल’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्का देऊन गौरविण्यात आले तर आलिया भट्टला अभिषेक चौबे दिग्दर्शित ‘उडता पंजाब’ सिनेमातील तिच्या उत्तम अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात येणार आहे.
ज्युनिअर एनटीआरनेही ‘जनथा गरागे’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावावर कोरला. तर धनुषला ‘पा पंडी’ या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. मल्याळम विभागात ‘वदक्कन सेल्फी’ सिनेमासाठी दलकर सलमानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.