News Flash

Secret Superstar trailer: आमिर खान आणि झायराची संगीतमय कहाणी

१९ ऑक्टोबर रोजी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

aamir khan
आमिर खान

जेव्हापासून बॉलिवूडच्या परफेक्शनिस्ट आमिर खानने त्याचा आणि बालकलाकार झायरा वसीमच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ चित्रपटाची घोषणा केली होती. तेव्हापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळत होती. आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

संगीत दिग्दर्शकाची भूमिका साकारणाऱ्या आमिरच्या दमदार एन्ट्रीने ट्रेलरची सुरुवात होते. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. झायराला प्रसिद्ध गायिका व्हायचं असतं पण तिच्या स्वप्नांच्या मार्गात सर्वांत मोठा अडथळा असतो तो म्हणजे तिचे वडील. तरीही न खचता ती बुरखा घालत आणि नाव लपवत आपल्या गाण्याचे व्हिडिओ ती यूट्युबवर शेअर करत असते. या व्हिडिओमुळे ती एका रात्रीत स्टार होते. संपूर्ण जगाला आपल्या आवाजाची ओळख व्हावी अशी झायराची इच्छा असते. तिच्या या स्वप्नात तिची आई तिला मदत करताना दिसते.

या ट्रेलरमध्ये आपलं स्वप्न पूर्ण करताना झायराच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आणि या अडचणींवर ती मात करत पुढे जाताना दिसते. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘दंगल’नंतर आमिर आणि झायराची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

वाचा : अर्वाच्च्य शब्दांत टीका करणाऱ्या भैरवी गोस्वामीला क्रितीचं सडेतोड उत्तर

याआधी चित्रपटाचा पोस्टर आमिर खानने ट्विटर अकाऊंटवर शेअर केला होता. या पोस्टरमध्ये झायरा वासिम शाळेच्या गणवेशात, गिटार वाजवताना स्वतःच्याच जगात रमलेली दिसते. तर दुसरीकडे आमिर खान एका रॉकस्टारच्या लूकमध्ये दिसतो. १९ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 8:09 pm

Web Title: aamir khan and zaira wasim movie secret superstar trailer released
Next Stories
1 अर्वाच्च्य शब्दांत टीका करणाऱ्या भैरवी गोस्वामीला क्रितीचं सडेतोड उत्तर
2 … आणि जनाई- सारावरच साऱ्यांच्या नजरा!
3 PHOTOS : अंतराळवीर होण्यासाठी सुशांतची तयारी सुरु
Just Now!
X