15 January 2021

News Flash

‘करण जोहरने मला कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला’; आमिर खानच्या भावाचा खुलासा

'त्याने अनेक वेळा माझा अपमान केला'; फैसल खानने व्यक्त केल्या भावना

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणानंतर कलाविश्वातील घराणेशाही, गटबाजी असे अनेक मुद्दे चर्चेत आले. यात अभिनेत्री कंगना रणौतने चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि महेश भट्ट यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला होता. त्यानंतर आता अभिनेता आणि आमिर खानचा भाऊ फैसल खान याने करण जोहवर काही आरोप केले आहे. करण जोहरने वारंवार माझा अपमान केला असून मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केल्याचं त्याने ‘बॉलिवूड हंगामा’च्या मुलाखतीत सांगितलं आहे.

“आमिरच्या ५० व्या वाढदिवशी एका व्यक्तीने मला कमीपणा दाखवायचा प्रयत्न केला. खरं तर मी आता त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही. पण करण जोहरनेदेखील माझ्यासोबत तेच केलं. तो माझ्यासोबत विचित्र पद्धतीने वागत होता आणि वारंवार मला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा मी कोणाशी बोलण्याचा प्रयत्न करायचो करण सतत माझा अपमान करत होता. त्यामुळे या घटनेनंतर अनेक गोष्टी घडल्या, ज्या संघर्षातून मला जावं लागलं”, असं फैसलने सांगितलं.

पुढे तो म्हणतो, “कलाविश्वातील अनेकांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये येण्यासही मनाई केली होती. मेला चित्रपटाचं यश पाहिल्यानंतर लोकांना माझं काम आवडेल आणि ते मला काम देतील असं वाटलं होतं. त्यामुळे मी अनेक दिग्दर्शकांच्या कार्यालयात गेलो. मात्र मला अनेकांनी त्यांची अपॉइमेंटच दिली नाही. जर तुमचे वडील मोठे डायरेक्टर असतील तर ते एका फोनवर तुमचं काम करतील, पण पुढे तुम्हालाच स्वत:ला सिद्ध करायचं असतं. पण मला वाटतं बॉलिवूडमधील अनेक इनसाइडर्स हे अपयशी ठरतात कारण त्यांनी संधी मिळते, पण स्वत:ला सिद्ध करता येत नाही”.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कलाविश्वातील घराणेशाही, गटबाजी असे अनेक मुद्दे चर्चिले जात आहेत. यात अभिनेत्री कंगना रणौतने करण जोहर आणि महेश भट्टवर ताशेरे ओढले होते. तसंच त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला होता. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी कलाविश्वात त्यांना मिळालेल्या वागणुकीवर भाष्य केल्याचं पाहायला मिळालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2020 12:14 pm

Web Title: aamir khan brother faisal khan accuses karan johar for misbehaving says he put me down ssj 93
Next Stories
1 “किती खोट्या तक्रारी करणार?”; रिया चक्रवर्तीला सुशांतच्या बहिणीचा सवाल
2 रियाच्या तक्रारीवरून सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल
3 कंगनाला मिळालेल्या Y+ सुरक्षेवरून स्वरा भास्करचा सरकारला अप्रत्यक्ष टोला
Just Now!
X