अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध प्रकारच्या पोस्ट करत असते. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ शेअर करत ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या निमित्ताने तिने मानसिक स्वास्थ सगळ्यांसाठी किती महत्त्वाच असतं या बद्दल सांगितलं होत. आता इराने एक पोस्ट शेअर करत या गोष्टीला पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. इरा कधी पासून मानसिक स्वास्थासाठी काम करायला सुरुवात करणार आहे. त्यासाठी तिला किती कॅंडिडेटची गरज आहे. या बद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने माहिती दिली आहे.

इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करत या बद्दल माहिती दिली आहे. इराने त्या पोस्टमध्ये सांगितले आहे की तिला २५ इनर्टनची गरज आहे. ज्यांना मानसिक स्वास्थमध्ये काम करण्याची आवड आहे ते लोक इथे अप्लाय करू शकतात. त्यांना ती एक महिना काम करण्यासाठी ५ हजार रुपये पगार देणार आहे. इनर्टनला काय काम करावा लागेल हे देखील इराने सांगितलं आहे. त्यांना फक्त फोन आणि ईमेल करावे लागतील. प्रत्येक राज्यातून एक म्हणजेच वेगवेगळ्या भाषेचे लोक एकत्र येऊन वेगवेगळ्या भाषेच्या लोकांना मदत करू शकतील. २२ मार्च पासून इनर्टनला जॉइन कराव लागेल त्यांची ८ तासाची शिफ्ट असेल. आणि कोणत्या ईमेल आयडीवर सीव्हि पाठवायचा हे देखील इराने त्या पोस्टमध्ये सांगितले आहे. दुसऱ्या स्टोरीमध्ये इराने तिचा एक फोटो शेअर केला आहे आणि ती म्हणाली की जर तुम्हाला फ्रीमध्ये दिवसातून एक-दोन तास काम करायचं असेल तरी तुम्ही तुमचा सीव्हि करू शकता. जर तुम्ही मला वैयक्तिकरित्या ओळखता तर मेसेज करून सांगा.

लॉकडाउनमुळे अनेक लोकांना मानसिकरित्या त्रास झाला. त्यांच्यासाठी हे फायदे कारक असेल. ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्ताने’ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत “मी गेल्या ४ वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होते आणि मी डॉक्टरकडे जातं आहे.” असे इराने सांगितले होते.