13 December 2019

News Flash

आमिरची मुलगी इरा खानने केले हॉट फोटोशूट

या फोटोमध्ये इरा हॉट अंदाजात दिसत आहे

इरा खान

बॉलिवूडमध्ये अनेक बड्या कलाकारांची मुले आता इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहेत. सैफ अली खान आणि चंकी पांडे यांच्या मुलींनीसुद्धा चित्रपटांमधून धमाकेदार पदार्पण केले आहे. शाहरुखनची मुलगी सुहाना खानने देखील एका मॅगझीनसाठी फोटोशूट केले. आता बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानच्या मुलीनेदेखील फोटोशूट केले आहे.

इराने या फोटोशूटचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना तिने “who are you ?” असे कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोमध्ये इराने काळ्या रंगाचे कपडे परिधाने केले असून ती लूक हटके असल्याचे दिसत आहे. दरम्यान ती अत्यंत हॉट अंदाजात दिसत आहे. तिचे हे फोटोसध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

” तू कोण आहेस? या प्रश्नाचे उत्तर मला कधीच मिळाले नाही. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मला जाणवले की, आपण आपल्याला हवे ते निवडू शकतो. आपण कोण आहोत हे एक ठराविक गोष्ट ठरवू शकत नाही” असे ती फोटोशूटबद्दल म्हणाली आहे. या फोटोमधून इराचा आत्मविश्वास दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून इरा खान आणि मिशालच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहेत. दरम्यान खुद्द इराने सोशल मीडियाद्वारे तिच्या रिलेशनशिपची कबुली दिली होती. इरा मिशालसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर शेअर करत असते.

First Published on August 13, 2019 1:56 pm

Web Title: aamir khan daughter ira khan new hot photoshoot avb 95
Just Now!
X