बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. नुकताच इराने सोशल मीडियावर चुलत बहिण झेन मॅरी खानच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमधील एका फोटोत इराचा बॉयफ्रेंड नूपुर शिखरे दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर इराने शेअर केलेले फोटो चर्चेत आहेत.

इरा आणि नुपूर गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आता नुपूर इराची बहिण झेनच्या लग्नाला पोहोचला आहे. इराने सोशल मीडियावर फोटो शेअर करत छान असे कॅप्शन दिले आहे. ‘या सुंदर लोकांसाठी आणि त्यांच्या नात्याबद्दल मी इतकच म्हणेन की अखेर तो क्षण आला’ या आशयाचे कॅप्शन इराने फोटो शेअर करत दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

लॉकडाउनदरम्यान इरा आणि नुपूर यांच्यातल्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झाले. आता हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचे समजतंय. महाबळेश्वर इथल्या आमिर खानच्या फार्महाऊसमध्ये दोघांनी सुट्ट्यांचा आनंद घेतला. इराने नुपूरची ओळख आई रिना दत्ता यांच्याशी करून दिली. इतकच नव्हे तर तिघांनी जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मिळून दिवाळी एकत्र साजरी केली होती. नुपूर हा फिटनेस कोच आहे.