बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते. नुकताच तिने तिच्या छोट्या भावासोबत शेअर केलेला फोटो सध्या चर्चेत आहे.
इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती लहान भाऊ आजाद खानसोबत दिसत आहे. तिने आजादला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
‘वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! माझा सर्वात कूल छोटा भाऊ’ असे कॅप्शन इराने फोटो शेअर करत दिले आहे. इराच्या या पोस्टवर टायगर श्रॉफने कमेंट करत आजादला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर कृष्णा श्रॉफने ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे म्हणत कमेंट केली आहे.
काही दिवसांपूर्वी इरा पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ती फिटनेस कोच नुपूर शिखरेला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. महाबळेश्वर इथल्या आमिर खानच्या फार्महाऊसमध्ये दोघांनी सुट्ट्यांचा आनंद घेतला. इराने नुपूरची ओळख आई रिना दत्ता यांच्याशी करून दिली. इतकंच नव्हे तर तिघांनी जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत मिळून दिवाळी एकत्र साजरी केली असल्याचे म्हटले जात होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 26, 2020 2:36 pm