News Flash

आमिरच्या मुलीचा बॉयफ्रेंडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

यापूर्वीही मिशाल आणि इराचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत

बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची मुले कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. त्यातील एक म्हणजे अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान. गेल्या काही दिवसांपासून इरा खान आणि मिशालच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहेत. दरम्यान खुद्द इराने सोशल मीडियाद्वारे तिच्या रिलेशनशिपची कबुली दिली होती. आता पुन्हा एकदा इराचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इरा आणि मिशाल एकत्र वेळ घालवताना दिसत असून ते दोघे नाचताना दिसत आहेत. त्या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीला उतरली आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव देखील केल्याचे पाहायला मिळत आहे.

यापूर्वीही मिशाल आणि इराचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. त्यातील इराच्या वाढदिवसाची पोस्ट सर्वात जास्त व्हायरल झाली होती. या पोस्टमध्ये मिशालने इरासाठी अत्यंत सुंदर संदेश लिहिला होता. त्या संदेशमध्ये ‘तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मला तुझ्यासोबत नेटफ्लिक्सवरील सर्व चित्रपट आणि सीरिझ पाहायचे आहेत’ असे लिहिले होते. त्याच्या या संदेशाने त्याने अनेकांची मने जिंकली होती.

तसचे इराला एकदा सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले होते. आमिर खानचा मुलगी इरासोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. फोटोत इराने शॉर्ट आणि स्लीव्हलेस नेकटॉप घातला होता. शॉर्ट्स घातल्याने इराला ट्रोल करण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 12:39 pm

Web Title: aamir khan daughter ira khan spending time with boyfriend mishal video viral avb 95
Next Stories
1 गैरवर्तनामुळे पराग कान्हेरे बिग बॉसच्या घराबाहेर?
2 ‘चमच्याच्या नशिबात खरकटं राहणंच’, नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी जगताप यांचा सल्ला
3 बिग बींनी शेअर केला मुलीसोबतचा हा खास फोटो
Just Now!
X