सोशल मीडियावर चित्रविचित्र फोटो पोस्ट करत आमिर खानची लेक इरा खान नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असते. आता मात्र तिने सोशल मीडियावर एक वेगळीच इच्छा बोलून दाखवली आहे. ज्यामुळे नेटकऱ्यांना इराबाबत मोठा प्रश्न पडला आहे. लॉकडाउनमुळे घरीच असलेल्या इराने चाहत्यांना सोशल मीडियावर प्रश्न विचारण्याची संधी दिली. त्यावेळी एकाने तिला सोशल डिस्टन्सिंगसाठी काय करतेय असा प्रश्न विचारला. यावर इराने दिलेलं उत्तर वाचून तुमचेही डोळे विस्फारतील.

नेटकऱ्याच्या प्रश्नावर इराने लिहिलं, ‘मी विचार करतेय की मी सान्या मल्होत्राला डेट करायला हवं.’ इतकंच नव्हे तर तिने सान्याला टॅग केलं आणि लिहिलं, ‘तुम्ही मला सर्वांत आधी निवडायला हवं’. आता इराच्या या प्रश्नावर सान्या काय उत्तर देते ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सान्याने ‘दंगल’ चित्रपटात आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. तेव्हापासून सान्या व इरा एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत.

स्टारकिड्सच्या बाबतीत चाहत्यांमध्ये विशेष क्रेझ असते. इरा खान अद्याप बॉलिवूडमध्ये आली नसली तरी सोशल मीडियावर तिची फॅन फॉलोइंग मोठी आहे. इराने अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो व व्हिडीओसुद्धा इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.