News Flash

आमिर खानपेक्षाही इतकी जास्त शिकलेली आहे किरण राव…

किरण रावसोबत लग्न करण्यासाठी आमिरला ५० कोटी रूपयांची भरपाई करावी लागली होती. किरण आमिरपेक्षा किती जास्त शिकलीय यासारख्या अनेक गोष्टी जाणून घ्या....

(Express Photo by Dilip Kagda)

बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेश्कनिस्ट’ आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी लग्नाच्या १५ वर्षानंतर एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या एक स्टेटमेंट जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली आहे. मुलाचा सांभाळ करण्यासोबत फिल्म, पाणी फाउंडेशन आणि इतर अनेक प्रोजेक्टमध्ये कमर्शिअल नातं कायम ठेवू, असं या दोघांनी सांगितलं. आमिर खान आणि किरण राव यांची लव्हस्टोरी कुठून सुरू झाली, हे खूप कमी लोकांना माहितेय. तसंच किरण रावसोबत लग्न करण्यासाठी आमिरला ५० कोटी रूपयांची भरपाई करावी लागली होती, हे देखील अनेकांना माहिती नाही. किरण राव आमिरपेक्षा किती जास्त शिकलीय यासारख्या अनेक गोष्टी जाणून घ्या….

इथून सुरू झाली आमिर आणि किरणची लव्हस्टोरी

२००० साली ‘लगान’ चित्रपटा दरम्यान आमिर आणि किरणची पहिली भेट झाली. त्यावेळी आमिर आधीच विवाहीत होता. त्यावेळी किरण ‘लगान’ चित्रपटासाठी समीर देसाई यांना असिस्ट करत होती. या चित्रपटा दरम्यान पहिल्या भेटीतच किरण आमिरला आवडली होती. त्यानंतर एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांमध्ये प्रेमाचं नात बनत गेलं. अखेर आमिरने पहिली पत्नी रिना दत्तसोबत घटस्फोट घेतला आणि २००५ मध्ये आमिरने किरणसोबत लग्नगाठ बांधली.

१० रूपये पगार घेत होती किरण…

ज्यावेळी आमिर आणि किरण या दोघांची पहिली भेट ‘लगान’ चित्रपटा दरम्यान झाली, त्यावेळी किरणचा पगार फक्त महिना १० हजार इतकाच होता. या चित्रपटात दिग्दर्शकाला असिस्ट करण्यासाठी तिला १० हजार रूपये दिले जात होते. पण ज्यावेळी तिने आमिर खानसोबत लग्न केलं, त्यानंतर तिचे दिवस बदलत गेले. लग्नानंतर किरणने दिग्दर्शित केलेले ‘डेली बेली’, ‘धोबी घाट’, ‘पीपली लाइव’ हे चित्रपट सुपरहिट ठरले. एकेकाळी १० हजार रूपये पगार घेणारी किरण रावची सध्याची एकूण मालमत्ता सुमारे 20 मिलिअन डॉलर्स म्हणजेच जवळपास 146 करोड इतकी आहे. किरण एक सर्वाधिक कमाई करणारी महिला दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहे.

लग्न करण्यासाठी आमिरला ५० कोटींची किंमत चुकवावी लागली

हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. किरण रावसोबत लग्न करण्यासाठी आमिरला तब्बल ५० कोटींची किंमत चुकवावी लागली, हे खूप कमी लोकांना माहितेय. पण ही किंमत किरणसाठी नव्हे तर पहिली पत्नी रिना दत्तसाठी चुकवावी लागली. २००२ मध्ये आमिरची भेटी किरणशी झाल्यानंतर दोन वर्षांनी रिना दत्त आणि आमिर खानने घटस्फोट घेतला. पण हा घटस्फोट घेण्यासाठी पहिली पत्नी रिनाला ५० कोटी रूपये द्यावे लागले होते. त्यानंतर आमिरने किरणशी लग्न केलं.

आमिरपेक्षा इतकी जास्त शिकलीय किरण राव

आमिर खान फक्त १२ वी पास आहे, हे सगळ्यांनाच माहितेय. पण त्याचं नॉलेज पाहता त्याला कोणत्या पदवीमध्ये मोजता येणार आहे. पण किरण राव आमिरपेक्षाही जास्त शिकलेली आहे. तिने कोलकत्ता इथल्या लोरेटो हाउसमधून शालेय शिक्षण घेतलं. मुंबईल्या सोफिया कॉलेज ऑफ वुमनमधून तिनं पदवी शिक्षण घेतलंय. तर दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामिया कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. तिने अर्थशास्त्र ऑनर्समध्ये पदवी आणि मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2021 9:23 pm

Web Title: aamir khan divorce kiran rao education and aamir khan education prp 93
Next Stories
1 ‘पवित्र रिश्ता 2.0’ मध्ये सुशांत सिंह राजपूतला मिस करणार का अंकिता लोखंडे?
2 दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत पत्नी सायरा यांनी दिली अपडेट; आज नाही मिळाला डिस्चार्ज
3 Video: छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता भूषण प्रधानने ‘असा’ केला अभ्यास
Just Now!
X