12 July 2020

News Flash

पटणाच्या ढाब्यावर आमिरने घेतला ‘लिट्टी-चोखा’चा स्वाद

आगामी 'पीके' चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता आमिर सध्या दौ-यावर आहे. शनिवारी बिहारला या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात आली.

| December 8, 2014 10:53 am

आगामी ‘पीके’ चित्रपटाच्या प्रसिद्धीकरिता आमिर सध्या दौ-यावर आहे. शनिवारी बिहारला या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात आली. यावेळी आमिरने तेथील लिट्टी चोखा या खाद्याचा आस्वाद घेतला. “लिट्टी चोखा हे त्याच्या विशेष चवीसाठी प्रसिद्ध आहे. मला हा पदार्थ खाण्यास खूप आवडतो,” असे आमिरने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
आमिर येणार असल्याची बातमी कळल्यामुळे हजारो नागरिक त्याला बघण्यासाठी आले होते. मात्र, त्यांना निराश होऊन घरी परतावे लागले कारण, त्यापूर्वीच आमिर तेथून निघून गेला होता. आमिरने बिहारी राय या दुकानावर लिट्टी चोखाचा स्वाद घेतला. त्यानंतर या दुकानात सदर पदार्थ खाण्यासाठी प्रचंड गर्दी होऊ लागल्याचे दुकानाचे मालक बिहारी राय यांनी सांगितले. आपल्या दुकानाकडे जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी राय यांनी आमिरसोबतच्या छायाचित्रांचा बॅनर करून लावला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2014 10:53 am

Web Title: aamir khan eats litti chokha at patna roadside shop
Next Stories
1 शनिवारवाड्यावर पुन्हा एकदा घुमणार लोकमान्यांची गर्जना
2 प्रेमाची खरी परिभाषा सांगणारा ‘लव्ह फॅक्टर’
3 आमिर खानचा बहुचर्चित ‘पीके’ हा चित्रपट येत्या १९ डिसेंबरला होणार प्रदर्शित
Just Now!
X