बॉलीवूडचा ‘मि. परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा आमीर खान हा नेहमीच वेगवेगळ्या ‘लुक’मध्ये पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळतो. त्याच्या या ‘लुक’ची चर्चाही होत असते. ‘लगान’, ‘पीके’ आणि अन्य काही चित्रपटांमधूनही तो वेगळ्या वेशभूषेत दिसला होता. आता पुन्हा एकदा आमीर वेगळ्या ‘लुक’मध्ये दिसणार आहे. आमीरचा हा नवा लुक त्याच्या आगामी ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातील असल्याचे सांगितले जाते.

याच महिन्यात ‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून आमीरकडे काम करणारा माजी व्यवस्थापक अद्वैत चंदन या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. गायक व्हायची इच्छा असलेल्या एका लहान मुलाची कथा चित्रपटातून सादर केली जाणार आहे. या चित्रपटात आमीर ‘पाहुणा कलाकार’ असल्याची चर्चा आहे.

boyfriend sent bride nude photos on groom mobile phone to break marriage
वधूचे अश्लील छायाचित्र नवरदेवाच्या मोबाईलवर पाठवले, हळदीच्या दिवशी प्रियकराच्या कृत्याने मोडले लग्न
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”

दरम्यान आमीर बॉलीवूडचे ‘बिग बी’ अर्थातच अमिताभ बच्चन यांच्यासमवेत ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपटात काम करणार आहे. पुढील वर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून २०१८च्या दिवाळीत हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.