28 October 2020

News Flash

‘दिल चाहता है’मध्ये काम करण्यासाठी आमिरने पाहिली होती सहा महिने वाट

जावेद अख्तर यांनी सांगितला मजेशीर किस्सा

फरहान अख्तर हा बॉलिवूडमधील एक अत्यंत प्रगोगशिल अभिनेता, दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. पडद्यावर जी व्यक्तिरेखा साकारायची आहे, त्या भूमिकेत शिरण्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी तो दर्शवतो. आजवर ‘भाग मिल्का भाग’, ‘रॉक ऑन’, ‘झिंदगी मिलेगी ना दोबारा’ यांसारख्या अनेक चित्रपटातून त्याने नेहमीपेक्षा वेगळे विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. तरी देखील अनेकदा त्याच्यावर घराणेशाहीचे आरोप केले जातात. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा असल्यामुळे त्याला चित्रपटात काम करण्याची संधी मिळते, असा आरोप त्याच्यावर केला जातो. दरम्यान या घराणेशाहीच्या आरोपावर जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्यांनी फरहानच्या पहिल्या चित्रपटाचा एक गंमतीशीर किस्सा सांगत त्याचं तोंड भरुन कौतुक केलं.

अवश्य पाहा – हे घर आहे की राजवाडा?; पाहा सुझान खानचं कोट्यवधींचं घर

जावेद अख्तर यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत घराणेशाहीवर भाष्य केलं. त्यावेळी त्यांनी फरहानचा हा किस्सा सांगितला. फरहानने २००१ साली एक दिग्दर्शक म्हणून ‘दिल चाहता है’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात काम करण्यासाठी त्याने अनेक नामांकित कलाकारांना विचारलं होतं. परंतु जवळपास १५ अभिनेत्यांनी त्याच्या स्क्रिप्टला नकार दिला. मात्र फरहानने हार मानली नाही. अखेर सैफ अली खान, अक्षय खन्ना आणि आमिर खान यांच्याकडून त्याने या चित्रपटासाठी होकार मिळवला. जेव्हा त्याने आमिरला स्क्रिप्ट दाखवली. तेव्हा मी जावेद अख्तर यांचा मुलगा आहे हे त्याने सांगितलं नव्हतं. त्याने केवळ एक दिग्दर्शक म्हणून स्क्रिप्ट दाखवली होती. फरहानचा हा गुण आमिरला खूप आवडला. पण त्याने लगेच होकार दिला नाही. तो काही दिवस जावेद अख्तर यांच्या फोनची वाट पाहात होता. परंतु त्यांचा फोन आला नाही म्हणून आमिरने ‘दिल चाहता है’ मध्ये काम करण्यास होकार दिला. लक्षवेधी बाब म्हणजे जेव्हा आमिरने जावेद अख्तर यांना फोन केला तेव्हा त्यांना या चित्रपटाबद्दल कळलं. वडिलांची कुठलीच मदत न घेता त्याने एका सुपरहिट चित्रपटाची निर्मिती केली. हा किस्सा सांगून जावेद अख्तर यांनी बॉलिवूडमध्ये कुठलीच घराणेशाही नसल्याचं सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 12:42 pm

Web Title: aamir khan javed akhtar farhan akhtar dil chahta hai mppg 94
Next Stories
1 ‘मिर्झापूर २’ची उत्सुकता वाढली; नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
2 कोरिओग्राफर टेरेन्सने नोरा फतेहीसोबत केले गैरवर्तन?
3 अभिनेता संजय चौधरीने सांगितला प्रवासातील धक्कादायक अनुभव
Just Now!
X