28 October 2020

News Flash

‘लालसिंह चढ्ढा’चे चित्रीकरण पूर्ण

या चित्रीकरणासाठी करिनाने पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर यांच्यासह दिल्ली गाठली होती.

‘फॉरेस्ट गम्प’ या टॉम हँक्स अभिनीत हॉलीवूडपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. गेले काही दिवस या चित्रीकरणासाठी अभिनेत्री करिना कपूर खान दिल्लीमध्ये तळ ठोकू न होती. पतौडी पॅलेसमध्ये निवास आणि दिल्लीत चित्रीकरण या चक्रात अडकलेल्या करिनाची अखेर सुटका झाली आहे. करिना दुसऱ्यांदा गर्भवती असल्याकारणाने तिला हातात असलेल्या चित्रपटांचे चित्रीकरण लवकरात लवकर पूर्ण करायचे होते. ‘लालसिंह चढ्ढा’ हा त्यातला महत्त्वाचा चित्रपट मानला जातो.

करोनामुळे आलेले निर्बंध आणि गर्भवती असल्याने घ्यावी लागणारी काळजी या दोन्हींमुळे अतिशय कसरत करत या चित्रपटाचे चित्रीकरण करिनाला पार पाडावे लागले आहे. या चित्रीकरणासाठी करिनाने पती सैफ अली खान आणि मुलगा तैमूर यांच्यासह दिल्ली गाठली होती. दिल्लीत दिवसभर चित्रीकरण करून मग पतौडी पॅलेस गाठायचे हा दिनक्रम सांभाळत करिनाने हे चित्रीकरण पूर्ण के ले. प्रत्येक प्रवास कु ठे ना कु ठे तरी येऊन थांबतोच.. आज मी माझ्या ‘लालसिंह चढ्ढा’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. करोनाचे संकट, गर्भारपण, सतत येणारा उदासीनपणा.. कशाकशाचाही फरक न पडू देता, सगळी खबरदारी घेऊन आम्ही झपाटल्यासारखे या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले, असे सांगत करिनाने याबद्दल सहकलाकार आमिर खान आणि दिग्दर्शक अद्वैत चंदनसह आपल्या सगळ्या टीमचे आभार मानले आहेत. इतक्या अडचणीतून झालेला हा प्रवास तितकाच संस्मरणीय होता, असेही तिने यात म्हटले आहे.

करिनाच्या समाजमाध्यमावरील या पोस्टवर आमिरनेही तितकेच गमतीशीर उत्तर दिले आहे. ‘कशाबद्दल बोलते आहेस तू करिना? कु ठला प्रवास संपला? मी तर उलट अद्वैतला आणखी काही दृश्ये लिहायला सांगितली आहेत, जेणेकरून आम्ही तुझ्याबरोबर चित्रीकरण करू शकू ..’ अशी पोस्ट करत आमिरने करिनाची फिरकी घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 12:22 am

Web Title: aamir khan kareena kapoor starrer lal singh chaddha movie shooting complete zws 70
Next Stories
1 प्रसिद्ध कवी प्रदीप घोष यांचं करोनामुळे निधन
2 चित्रपटाचं नाव ‘लक्ष्मी बॉम्ब’ का ठेवलं? दिग्दर्शकाने सांगितलं खरं कारण
3 लग्नानंतर पहिल्यांदाच मिहिकाने शेअर केला राणासोबतचा खास फोटो, म्हणाली…
Just Now!
X