News Flash

दोन दिवसात ‘धूम ३’ ची ६९.५८ कोटींची कमाई

यशराज बॅनरचा 'धूम ३' हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेतील चित्रपट आहे. या चित्रपटाने दोनच दिवसांत त्याची कमाल दाखवली आहे.

| December 23, 2013 04:21 am

यशराज बॅनरचा ‘धूम ३’ हा या वर्षातील सर्वाधिक चर्चेतील चित्रपट आहे. या चित्रपटाने दोनच दिवसांत त्याची कमाल दाखवली आहे. या चित्रपटाविषयी प्रदर्शनाच्या ३ महिन्यांपूर्वीपासूनच चर्चा सूरु झाली होती. यावर्षातील हा सर्वात मोठा चित्रपट ठरेल, असा अंदाज चित्रपट समीक्षकांनी लावला होता. समीक्षकांचा हा अंदाज खरा ठरला असून, धूम ३ ने केवळ दोन दिवसांतच ६९. ५८ कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने शाहरूख खानच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाचा विक्रम मोडला होता. पहिल्या दिवशी ३६.२२ कोटी आणि दुस-या दिवशी ३३.३६ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. आमिरसोबत कतरिना, अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेला धूम ३ हा २० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र, तरीही वर्षाच्या अखेरीस आलेल्या या चित्रपटाने तिकीट बारीवर सुसाट कामगिरी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 4:21 am

Web Title: aamir khan katrina kaifs dhoom 3 collects rs 69 58 crore in 2 days
टॅग : Katrina Kaif
Next Stories
1 सलमानला फसवण्याची योजना बनवणाऱ्या चित्रपट निर्मात्यास अटक
2 श्रीदेवी, बॉनी कपूरच्या बंगल्याला आग
3 ‘मौसम’च्या अपयशानंतरही शाहिदच्या खिशात १८ चित्रपट
Just Now!
X