News Flash

PHOTOS : आमिर-किरणने थीम पार्कमध्ये साजरा केला आझादचा वाढदिवस

'अॅडलॅब्स इमॅजिका' या थीम पार्कमध्ये रविवारी आमिर, किरण, आझाद आणि मोठा मुलगा जुनैद गेले होते.

आमिर खान आणि किरण राव हे उत्तम पालक असल्याचे उदाहरण आहेत.

आमिर खान आणि किरण राव हे उत्तम पालक असल्याचे उदाहरण आहेत. आगामी ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या चित्रीकरणात व्यस्त असतानाही आमिर आणि किरणने वेळात वेळ काढून मुलगा आझाद राव खानचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्त आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यास या दोघांनी प्राधान्य दिले.

वाचा : बिपाशा-करणच्या ‘त्या’ जाहिरातीला सलमानचा विरोध

आझादला थीम पार्कची बरीच आवड आहे. आपल्या मुलाची आवड लक्षात घेता आमिर – किरण त्याला वॉटर पार्कमध्ये घेऊन गेले होते. तेथे या चिमुकल्याने विविध वॉटर राइड्सचा पुरेपूर आनंद लुटला. येत्या १ डिसेंबरला आझाद सहा वर्षांचा होईल. त्यादिवशी आपल्या छोट्या मित्रांसोबत तो मजामस्ती करेलच पण त्याआधीच आमिर आणि किरणने त्याचा आनंद द्विगुणीत करण्याचे ठरवले.

वाचा : पहिल्या चित्रपटासाठी खिलाडी कुमारला किती मानधन मिळाले माहितीये?

मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या ‘अॅडलॅब्स इमॅजिका’ या थीम पार्कमध्ये रविवारी आमिर, किरण, आझाद आणि मोठा मुलगा जुनैद गेले होते. अॅडलॅब्स इमॅजिकाने या कुटुंबाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहता सर्वांनी केलेल्या मस्तीचा आपण अंदाज लावू शकतो. स्विमिंग पूल, अॅडव्हेंचर स्लाइड्समध्ये जाण्यापासून आझादच्या वाढदिवसाचा केक कापण्यापर्यंत त्यांनी सगळ्याचा आनंद उपभोगला. तसेच, थंडीच्या दिवसांमध्येही आईस्क्रीम खाण्याचा मोहसुद्धा ते आवरू शकले नाहीत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 9:28 am

Web Title: aamir khan kiran rao ring in azads 6th birthday at a theme park of adlabs imagica
Next Stories
1 बिपाशा-करणच्या ‘त्या’ जाहिरातीला सलमानचा विरोध
2 TOP 10 NEWS : मनोरंजन विश्वातील ठळक घडामोडी आणि गॉसिप
3 पहिल्या चित्रपटासाठी खिलाडी कुमारला किती मानधन मिळाले माहितीये?
Just Now!
X