25 March 2019

News Flash

आमिरच्या पहिल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये ‘ती’ खास व्यक्ती

आमिरनं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं आहे

आमिर खान

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज ५३ वर्षांचा झाला. आपल्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर अकाऊंट सुरू करून त्यानं आपल्या चाहत्यांना छान सरप्राईज दिलं आहे. काही दिवसांपूर्वीच आमिर इन्स्टाग्रामवर आपलं अकाऊंट सुरु करणार असल्याच्या चर्चा होत्या पण यासाठी तो आपल्या वाढदिवसाची वाट बघत होता. अखेर या फोटो शेअरिंग अॅप पासून स्वत:ला फार लांब न ठेवता आमिरनं आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरू केलं आहे.

विशेष म्हणजे अमिरनं त्यावर काही पोस्ट करण्याआधीच अडीच लाखांहून अधिक लोकांनी त्याला फॉलो करायला सुरूवातही केली होती. आमिरनं आपल्या पहिल्यावहिल्या पोस्टमधून आपली आई जीनत हुसैन यांचा फोटो शेअर केला आहे. ‘आज मी जो आहे ते केवळ आणि केवळ तिच्यामुळेच आहे’ असं लिहित आमिरनं आईचा जूना फोटो शेअर केला आहे.

गेल्यावर्षी आमिरचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट आला होता, चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी त्याची आईदेखील सोबत होती. आमिरचा हा चित्रपट पाहून त्या आपल्या अश्रू रोखू शकल्या नव्हत्या. त्यामुळे आपली पहिलीवहिली पोस्ट त्यांनी आईला सर्मपित केली आहे. काही तासांपूर्वीच आमिरनं आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु केलं विशेष म्हणजे काही तासांतच त्यांच्या फॉलोवर्सची संख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे.

First Published on March 14, 2018 2:13 pm

Web Title: aamir khan makes a spectacular debut on instagram on his 53rd birthday