01 October 2020

News Flash

‘बिग बी’ समोर असले की मला डायलॉग्सही आठवत नाही- आमिर

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटात अमिर खान आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करत आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अमिताभ बच्चन आणि ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर एकत्र येणार आहेत. एकीकडे ‘मी नव्हे, तर अभिनेता आमिर खान हाच महान अभिनेता आहे’ असं म्हणत बिग बी यांनी आमिरच्या अभिनय कौशल्याचं खुलेपणानं कौतुक केलं आहे.

नुकताच आमिरनं बच्चन यांच्यासोबतच्या काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. ‘ते समोर असले की मला धड बोलताही येत नाही. आम्ही कामाला सुरूवात केली तर मला माझे डायलॉगही आठवत नव्हते. अनेकदा मी स्वत: भरकटायचो’ असं म्हणत आमिरनं आपली भीती व्यक्त केली आहे. ‘मी आणि आमिताभ बच्चन सेटवर चित्रिकरणाच्या आधी एकत्र बसतो आणि आमचे डायलॉग तोंडपाठ करून घेतो. मात्र एवढ्यामोठ्या कलाकारासोबत काम करताना दडपण येतं’ अशा भावनाही त्यानं व्यक्त केल्या आहेत.

एका कार्यक्रमादरम्यान वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ‘आमिर महान अभिनेता आहे. मी त्याचे अनेक चित्रपट पाहिले आहेत आणि त्यांचा आनंदही घेतला आहे. तो एक परिपूर्ण अभिनेता आणि एक उत्तम अभिनेता आहे’, असे बिग बी म्हणाले. या चित्रपटाच्या निमित्ताने दोन महान कलाकार एकत्र येणार असल्याचे विचारले असता अमिताभ बच्चन यांनी त्यांचे मत मांडले होते. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘धूम ३’चे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य करत आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 12:58 pm

Web Title: aamir khan on working with amitabh bachchan in thugs of hindostan
Next Stories
1 पहिल्यांदाच ‘शेफ’च्या भूमिकेत झळकणार दिव्यांका
2 सासऱ्याची कंपनी कर्जबाजारी, तरी प्रियांका – निकचं लग्न धुमधडाक्यातच
3 शाहरूखमुळेच कतरिनानं मला होकार दिला – सलमान खान
Just Now!
X