06 March 2021

News Flash

“आणखी वाट पाहू शकत नाही,”; हा नवा चित्रपट पाहण्यासाठी आमिर झाला उतावळा

आमिरची उत्सुकता पोहोचली शिगेला; हा चित्रपट पाहण्यासाठी करतोय विशेष तयारी

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अलिकडेच या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्ट आमिर खान प्रचंड खुश झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी आता मी आणखी वाट पाहू शकत नाही असं म्हणत त्याने अक्षयवर स्तुतीसुमनं उधळली आहेत.

अवश्य पाहा – ‘रामायणात १४ वर्षांचा वनवास होतो अन् करोनात…’; अभिनेत्रीने मानले BMC चे आभार

नेमकं काय म्हणाला आमिर खान?

“प्रिय अक्षय कुमार, मी लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. मला हा ट्रेलर खुप आवडला. मित्रा आता मी हा चित्रपटा पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. हा चित्रपट जर सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला असता तर वेगळीच मजा आली असती.” अशा आशयाचं ट्विट करुन आमिर खानने अक्षयला लक्ष्मी बॉम्ब चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज; पूजा भट्टने देशवासीयांना केली मदतीची विनंती

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट ‘कंचना’ या तमिळ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 4:47 pm

Web Title: aamir khan praised laxmmi bomb trailer akshay kumar mppg 94
Next Stories
1 “मला अस्थमा आहे आणि निकला…”: करोनासंदर्भातील प्रश्नावर प्रियांकाचे उत्तर
2 अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी पोलिसांचा छापा
3 ‘डान्सिंग क्वीन’च्या मंचावर ‘माझ्या नवऱ्याची बायको’चे कलाकार
Just Now!
X