२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रोबोट’ या चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर दिग्दर्शक एस. शंकर यांनी त्याच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली. ‘२.०’ असं शीर्षक असलेला हा चित्रपट घोषणेपासूनच चर्चेत राहिला आहे. यामध्ये अक्षय कुमार खलनायकाची भूमिका साकारणार असून मुख्य भूमिका रजनीकांत साकारणार आहेत. पण अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खानला यामध्ये मुख्य भूमिका साकारण्याची सुरुवातीला ऑफर दिली होती.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आमिरने याचा खुलासा केला. चित्रपटाची पटकथाही त्याला खूप आवडली होती. इतकंच नाही तर हा चित्रपट सर्व विक्रम मोडणार असंही म्हटलं. आरोग्याच्या काही समस्या असल्याने रजनीकांत यांनी स्वत: हा प्रोजेक्ट आमिरला स्विकारण्यास सांगितलं होतं. मात्र, रजनीकांत यांनी ‘रोबोट’मध्ये ज्याप्रकारे भूमिका साकारली त्याला ‘२.०’मध्ये आपण न्याय देऊ शकणार नाही असं सतत आमिरला वाटत होतं. ‘मी जेव्हाही डोळे बंद करायचो तेव्हा रजनीकांतच मला त्या भूमिकेत दिसायचे. मी स्वत:ला त्या भूमिकेत पाहूच शकत नव्हतो,’ असं तो म्हणाला. अखेर त्याने एस. शंकर यांची ही ऑफर नाकारली.
#Rajini Sir call me & told me 2 do his role n #2Point0
But I couldn't c myself n role f Rajini
It wil create History pic.twitter.com/LZuJOPrjQn— Rajinikanth fans (@Rajni_FC) October 19, 2017
वाचा : ‘तिची’ शेवटची इच्छा शाहरुख पूर्ण करणार?
आमिर खान सर्व गोष्टींचा विचार करूनच एखादी भूमिका स्विकारतो. प्रत्येक गोष्टीवर चाणाक्ष विचार करणाऱ्या आमिरला म्हणूनच ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हटलं जातं. ‘२.०’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तब्बल ४५० कोटी रुपयांचा याचा बजेट आहे. जगभरात सुमारे १५ भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या या बहुचर्चित चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतेय.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 20, 2017 7:05 pm