09 August 2020

News Flash

वाढदिवसाच्या दिवशी आमिर सचिनला म्हणतोय ‘आता क्या खंडाला?’

कलाविश्वापासून ते क्रीडाविश्वापर्यंत सारेच जण त्याला हटके अंदाजात शुभेच्छा देत आहे.

मि.परफेक्शनिस्ट आमिर खान याच्या गुलाम चित्रपटातील ‘ए क्या बोलती तू…’ हे गाणं साऱ्यांनाच परिचित आहे. हे गाणं आजही तरुणाईच्या ओठी गुणगुणताना पाहायला मिळतं. या गाण्यात आमिरसोबत अभिनेत्री राणी मुखर्जी झळकली होती. विशेष म्हणजे याच गाण्याचा आधार घेत क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडूलकरने आमिरला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. आज आमिरचा ५४ वा वाढदिवस आहे. त्यामुळे सचिनने त्याला हटके अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच काय तर आमिरने देखील त्याच शैलीत सचिनचे आभार मानले आहेत.

मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा आज वाढदिवस असल्यामुळे सर्व स्तरांमधून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. अगदी कलाविश्वापासून ते क्रीडाविश्वापर्यंत सारेच जण त्याला हटके अंदाजात शुभेच्छा देत आहे. त्यामुळेच सचिन तेंडूलकर यानेही ट्विटरच्या माध्यमातून आमिरला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देतांना ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आमिर..ए क्या बोलता तू ‘? असं सचिनने म्हटलं आहे.

सचिनच्या या ट्विटला आमिरनेही रिट्विट करत हटके उत्तर दिलं आहे. ‘धन्यवाद आमिर, आता क्या खंडाला’ ? असं आमिरने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या या दोघांच्याही ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, आज आमिरचा ५४ वा वाढदिवस असल्यामुळे सर्व स्तरामधून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावर होत आहे. विशेष म्हणजे केवळ सेलिब्रेटीच नाही तर त्याचे चाहतेही त्याला अशाच अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देत आहेत. एका चाहत्याने तर आमिरचा फोटो देव्हाऱ्यात ठेऊन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र आमिरने दरवर्षीप्रमाणे त्याचा वाढदिवस मीडियासोबत सेलिब्रेट केल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2019 4:56 pm

Web Title: aamir khan s 54th birthday here is how sachin tendulkar wished him happy birthday
Next Stories
1 ..म्हणून प्रिया बापटने ‘चक दे इंडिया’ला दिला होता नकार
2 Video : ‘जबरा फॅन’! देव्हाऱ्यात फोटो ठेवून आमिरला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
3 या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा आमिर आणणार रिमेक
Just Now!
X