News Flash

आमिर म्हणाला घवघवीत यश मिळो, ‘पानिपत’मधील कलाकार म्हणाले…

“मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम”, असं पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचं वर्णन केलं जातं.

“मराठी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम”, असं पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचं वर्णन केलं जातं. महाराष्ट्रासाठी पानिपतची तिसरी लढाई दुःखदायक ठरली होती. याच युद्धावर आधारित आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी बॉलिवूड अभिनेता आमिर खानने ट्विट केले आहे. “आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत चित्रपटाला माझ्या शुभेच्छा. या चित्रपटाला घवघवीत यश मिळो” अशा शब्दात आमिर खानने शुभेच्छा दिल्या. आमिरच्या या ट्विटवर अभिनेता अर्जुन कपूरने प्रतिक्रिया दिली आहे. धन्यवाद आमिर सर, आम्हाला आशा तुम्हाला आमचा चित्रपट नक्की आवडेल. अशा शब्दात अर्जुनने आमिरचे आभार मानले.

आमिर खानचे ट्विट

अर्जुन कपूरने दिलेली प्रतिक्रिया

क्रिती सेननने दिलेली प्रतिक्रिया

‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटात पानिपतच्या तिसऱ्या युद्धाची कथा दाखवण्यात आली. यामध्ये अर्जुन कपूर सदाशिवराव भाऊ तर क्रिती पार्वतीबाईंची भूमिका साकारत आहे. यासोबतच संजय दत्त, मोहनिश बहल, पद्मिनी कोल्हापुरे आणि झीनत अमान यांच्याही भूमिका आहेत. येत्या ६ डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2019 5:10 pm

Web Title: aamir khan sends best wishes for panipat mppg 94
Next Stories
1 हिंमत असेल तर ये.. कपिल शर्माचे अक्षयला चॅलेंज
2 कंडोम बाळगा आणि बलात्काऱ्यांना सहकार्य करा, निर्मात्याचे वादग्रस्त विधान
3 जेम्स बॉण्डनं केली कमाल; एका स्टंटमुळे पोहोचला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
Just Now!
X