02 March 2021

News Flash

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चं दुसरं पोस्टर प्रदर्शित

या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकताही कमालीची वाढली आहे.

या वर्षीचा सर्वात मोठा चित्रपट अशी चर्चा असलेला ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाविषयी रोज नवनवीन चर्चा रंगताना दिसत आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकताही कमालीची वाढल्याचं पाहायला मिळत आहे. यादरम्यान या चित्रपटातील दुसरं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.

अमिताभ बच्चन, आमिर खान, कॅटरिना कैफ आणि फातिमा सना शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ची दुसरी झलक आमिरने प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे.

यशराज फिल्म्स बॅनरअंतर्गत तयार होणाऱ्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि आमिर खान झळकले आहेत. या फोटोत अमिताभच्या चेहऱ्यावर रागीट भाव दिसत असून आमिर कुत्सिकपणे हसताना दिसत आहे.

दरम्यान, बहुप्रतिक्षित ठरत असलेला हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित या चित्रपटाचा काही दिवसापूर्वी ट्रेलर प्रदर्शित झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंती उतरल्याचं पाहायला मिळत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 9:57 am

Web Title: aamir khan shared his upcoming film thugs of hindostan second posteron social media
Next Stories
1 #MeToo : …म्हणून अमृता पुरीवर फरहान नाराज
2 ‘हे तर धक्कादायक’
3 वे ब सी रि ज ही
Just Now!
X