News Flash

आमिरच्या लेकाचं बॉलिवूड पदार्पण लांबणीवर; ‘या’ दिग्दर्शकानं ऑडिशनमध्ये दिला नकार

आमिर खानचा मुलगा देतोय बॉलिवूडसाठी ऑडिशन

सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांची मुलंसुद्धा चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातही काही प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांबद्दलच्या अनेक लहानसहान गोष्टी जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. त्यातीलच एक सेलिब्रिटी किड म्हणजे जुनैद खान. बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळात अनेक स्टारकिडचं पदार्पण झालं. या पार्श्वभूमीवर आमिर खानच्या लेकाचं बॉलिवूडमध्ये डेब्यू कधी होणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र चाहत्यांना जुनैदच्या पदार्पणासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

अवश्य पाहा – “हा व्हिडीओ स्वत:च्या रिस्कवर पाहा”; ढिंच्यॅक पूजा नव्या गाण्यामुळे होतेय ट्रोल

जुनैद ‘इश्क’ या मल्याळम चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशी चर्चा होती. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी त्याने ऑडिशन देखील दिलं होतं. परंतु दिग्दर्शक निरज पांडे याने त्याला रिजेक्ट केलं आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार जुनैद त्या भूमिकेत चपखल बसत नव्हता त्यामुळे कास्टिंग टीमने त्याला नकार दिला. परंतु या नकारामुळे जुनैद नाराज झालेला नाही. मी आणखी मेहनत करुन पुन्हा प्रयत्न करेन असं तो म्हणाला.

अवश्य पाहा – ‘बॉण्ड गर्ल’च्या पहिल्या बिकिनीचा होतोय लिलाव; किंमत ऐकून व्हाल थक्क

जुनैदला अभिनयाची प्रचंड आवड आहे. सध्या तो जर्मनीमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत आहे. विशेषत: त्याला चित्रपटांऐवजी रंगभूमीवर काम करण्यात अधिक रस आहे. आजवर त्याने अनेक इंग्रजी आणि जर्मन भाषेतील नाटकांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच त्याला दिग्दर्शनाचीही त्याला आवड आहे. आमिरच्या ‘पीके’ या चित्रपटात त्याने राजकुमार हिरानीसोबत सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी स्विकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 11:24 am

Web Title: aamir khan son junaid khan bollywood debut mppg 94
Next Stories
1 Video : लग्नात शपथ घेतली का?; कपिलच्या प्रश्नावर रितेशचं भन्नाट उत्तर
2 ‘या’ चुकीमुळे सुजान खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट झाले हॅक
3 ..म्हणून अजय देवगणने आजपर्यंत नाही पाहिला काजोलचा DDLJ
Just Now!
X