20 October 2019

News Flash

‘द स्काय इज पिंक’चा ट्रेलर बघून आमिर म्हणतो…

आमिरने ट्विटद्वारे त्याचे मत मांडले आहे

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा कमबॅक चित्रपट ‘द स्काय इज पिंक’चा १० सप्टेंबर रोजी ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रियांकासोबत अभिनेता फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित शरफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर पाहता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची देखील ‘द स्काय इज पिंक’चा ट्रेलरपाहून चित्रपटाबाबती उत्सुकता वाढली आहे.

आमिर खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत प्रियांकाच्या ‘द स्काय इज पिंक’ची प्रशंसा केली आहे. ‘मला चित्रपटाचा ट्रेलर फार आवडला. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहणेही कठिण झाले आहे. असे वाटतय सोनालीने पुन्हा एकदा शानदार चित्रपटाची निर्मिती केली आहे. मला खात्री आहे चित्रपटात प्रियांका, फरहान आणि जायरा यांचा अभिनय सर्वांच्या मनावर राज्य करणार आहे. तुम्हा सर्वांना चित्रपटासाठी शुभेच्छा’ असे आमिरने ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘द स्काय इज पिंक’ ही एका कुटुंबाची भावनिक कथा आहे. ज्यामध्ये प्रियांका-फरहानची प्रेमकहाणी आणि त्यानंतर त्यांच्या मुलीला होणारा दुर्मिळ आजार याबद्दल दाखवण्यात आले आहे. किशोरवयीन झायरा त्यांच्या आई-वडिलांची प्रेमकहाणी सांगतानाच ट्रेलरची सुरुवात होते. आपल्या मुलीला झालेल्या आजारविषयी समजल्यानंतर त्या कुटुंबावर कोणता आघात होतो हे यातून पाहायला मिळते.

शोनाली बोस दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रियांका या चित्रपटातून तीन वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये परतत आहे. २०१६ मध्ये तिचा ‘जय गंगाजल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

First Published on September 16, 2019 2:27 pm

Web Title: aamir khan speaks about priyanka chopra upcoming movie the sky is pink avb 95