News Flash

आमिर खानच्या स्टाफला करोनाची लागण, आईची चाचणी बाकी

आमिरने फेसबुकवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली.

अभिनेता आमिर खानच्या टीममधील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. आमिरने फेसबुकवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. या कर्मचाऱ्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचसोबत इतरही कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली. आमिर खानच्या आईची करोना चाचणी बाकी असून तिला चाचणीसाठी घेऊन जात असल्याचं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं. त्याचसोबत तिचा रिपोर्ट निगेटिव्ह यावा यासाठी प्रार्थना करण्याची विनंती त्याने चाहत्यांना केली आहे.

काय आहे आमिरची पोस्ट? 

माझ्या काही कर्मचाऱ्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना ताबडतोब क्वारंटाइन करण्यात आले असून महानगरपालिकेकडून योग्य ती उपचाराची काळजी घेतली जात आहे. संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज केल्याबद्दल आणि करोनाबाधितांची योग्य ती काळजी घेतल्याबद्दल मी मुंबई महानगरपालिकेचे खूप आभार मानतो.

उरलेल्या कर्मचाऱ्यांची आणि माझी चाचणी करण्यात आली असून रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. सध्या मी माझ्या आईला करोना चाचणीसाठी घेऊन जात आहे. तिचाही रिपोर्ट निगेटीव्ह येऊ दे अशी प्रार्थना करा. त्वरित आणि काळजीपूर्वक उपाय केल्याबद्दल मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेचे आभार मानतो. कोकिलाबेन या रुग्णालयाचे आणि तिथल्या डॉक्टर्स, नर्सेस व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. करोना चाचणी करण्यात त्यांनी खूप मदत केली.

देशभरात एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असला, तरी करोनावर मात करणाऱ्यांच्या संख्याही वाढताना दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशभरात ३ लाख ३४ हजार ८२२ जणांनी करोनावर मात केली आहे. २९ जूनपर्यंत देशभरात एकूण ८६ लाख ८ हजार ६५४ नमूने तपासणी करण्यात आली आहे. यातील २ लाख १० हजार २९२ नमूने काल तपासले गेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 1:03 pm

Web Title: aamir khan staff test coronavirus positive ssv 92
Next Stories
1 Laxmmi Bomb: कुठलाही संप्रदाय दुखावणार नाही याची काळजी घेतलीय- अक्षय कुमार
2 “देश वाचवल्याबद्दल आभार, टिकटॉक नावाच्या व्हायरसला पुन्हा परवानगी देऊ नका”
3 मैत्री असावी तर अशी; सुशांतसाठी भूमि पेडणेकर करणार अन्नदान
Just Now!
X