21 April 2019

News Flash

आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ मोडले हे सहा बॉक्स ऑफीस रेकॉर्ड

प्रदर्शनानंतर समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या पण त्याचा चित्रपटाच्या कमाईवर तसूभरही फरक पडला नाही.

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'

तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही, असंच काहीसं आमिरच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या चित्रपटाबाबत झालं आहे. आमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ अशी स्टारकास्ट असलेल्या या बिग बजेट चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. पण या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली. प्रदर्शनानंतर समीक्षकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया येऊ लागल्या पण त्याचा चित्रपटाच्या कमाईवर तसूभरही फरक पडला नाही. कारण पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५० कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला आहे. या धमाकेदार कमाईसोबतच ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने बॉक्स ऑफीसचे काही विक्रम मोडले आहेत.

१. प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे.

२. प्रदर्शनाच्या दिवशी ५० कोटी रुपयांचा आकडा पार करणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे.

३. तमिळ आणि तेलुगू भाषेतील कमाई मिळून ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने जवळपास ५२.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे एका दिवसात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम या चित्रपटाने आपल्या नावे केला आहे.

४. आतापर्यंत दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपैकी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘ठग्स ..’ आहे. याआधी सलमान खानच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपटाने दिवाळीला पहिल्या दिवशी ३९.३२ कोटी रुपये कमावले होते. चित्रपटाच्या आगाऊ बुकींगमुळे पहिल्या दिवशीच्या कमाईने इतका आकडा गाठला आहे.

(आणखी वाचा : बारावीत नापास झालो नसतो तर आज इथं नसतो- सुबोध भावे)

५. आमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कतरिना कैफ या स्टारकास्टचा हा पहिलाच चित्रपट ठरला आहे ज्याने प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, आमिर खानच्या ‘दंगल’ चित्रपटाने २९.७८ कोटी रुपयांचा तर कतरिनाच्या ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने ३४.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.

६. प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ हा बॉलिवूडचा पहिला चित्रपट असल्याने ‘यशराज फिल्म्स’ बॅनरचाही हा प्रदर्शनाच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरला आहे.

 

First Published on November 9, 2018 5:52 pm

Web Title: aamir khan thugs of hindostan broke these 6 box office records on the first day of its release