बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानला टीव्हीवर प्रदर्शित होणा-या ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमासाठी अमेरिकी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आमिर व्यतिरीक्त या पुरस्काराकरिता अमेरिकेतील विख्यात निर्माती कैथरीन बिगेलो आणि ‘इंटरनॅशनल सेंटर ऑन नॉन वायलेंट कन्फ्लिक्ट’ (आयसीएनसी) यांचीही निवड करण्यात आली आहे.
२८ ऑक्टोबरला वॉशिंग्टन डीसीमध्ये आमिरला ‘अमेरिका अब्रॉड मिडीया’ (एएएम) या पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे. एएएम म्हणाले की, आमिरचा ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रम भारतातील सर्वात मोठ्या सामाजिक समस्यांना समोर घेऊन आला आहे. तसेच, नुकतेच टाइम मासिकाच्या सर्वाधिक १०० प्रभावशाली लोकांच्या यादीसाठीही आमिरच्या नावाची निवड करण्यात आली होती.