बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खान आज (१४ मार्च) त्याचा ५१वा वाढदिवस साजरा करत आहे. जिनियस, परफेक्टशनिस्ट, मि.ब्लॉकब्सटर म्हणून ओळखल्या जाणा-या आमिरने भारतीय चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारवारीत नेले होते. प्रेश्रकांना नक्की काय पाहायला आवडेल याची त्याला चांगलीच जाण आहे. बॉलीवूडच्या या मि. परफेक्शनिस्ट वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. यानिमित्त आमिरबद्दल फार कमी जणांना माहित असलेल्या १० गोष्टी जाणून घेऊया.
१. मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानने वयाच्या आठव्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने नसीम हुसैन यांच्या ‘यादो की बारात’ चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारली होती.
२. भारतीय स्वातंत्र्य सैनिक अब्दुल  कलाम आझाद यांच्या कुटुंबाशी आमिरचे नाते आहे.
३. यादो की बारातनंतर त्याने चित्रपटातील कामाला आराम दिला. त्यानंतर त्याने महाराष्ट्राच्या टेनिस संघासाठी खेळण्यास सुरुवात केली.
४. भारताचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉ. झाकीर हुसेन यांचा तो वंशज असून, त्याचे राज्यसभेच्या माजी अध्यक्ष डॉ.नजमा हेपतुल्ला यांच्याशी दूरचे नाते आहे.
५. तो आल्फ्रेड हिचकॉकच्या कथांचा चाहता आहे.
६. ‘राजा हिंदुस्तानी’ (१९९६) या चित्रपटाकरिता त्याला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता.
७. आमिरला आंघोळी करण्याचाही खूप कंटाळा येतो. तो म्हणतो की, “मी एक स्वच्छ व्यक्ती आहे त्यामुळे मला आंघोळी करण्याची गरज नाही.” करण जोहरच्या कॉफी विथ करण या कार्यक्रमात तो असे म्हणाला होता.
८. आमिरला मोठ्या आवाजातील संगीत ऐकायला अजिबात आवडत नाही. त्यामुळेच तो जास्त पार्टींमध्ये दिसत नाही.
९. ‘तारे जमीन पर’ या चित्रपटापासून त्याने सिगरेट ओढणे बंद केले होते. पण, त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख दोन महिन्यांवर आली की तो टेन्शनमुळे काहीवेळा सिगरेट ओढतो. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचे सिगरेट ओढणे आपोआप बंद होते.
१०. ‘डर’ चित्रपटातील राहुल मेहराच्या भूमिकेकरिता सर्वात आधी आमिरला विचारण्यात आले होते.